25 January 2025 6:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी 23 रुपयाच्या मल्टिबॅगर शेअरवर फ्री बोनस शेअर्स देणार, फायदा घ्या - NSE: SBC SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना सेव्ह करा, महिना SIP वर मिळेल 1.35 कोटी रुपये परतावा EPFO New Rule | खाजगी कर्मचाऱ्यांनो, EPFO ने नियम बदलले, कागदपत्रांशिवाय प्रोफाइल अपडेट करा, अन्यथा घामाचा पैसा गमवाल New Auto Taxi Fare | अच्छे दिन आ गए, बस, रिक्षा आणि टॅक्सी भाड्यात मोठी वाढ, इतके पैसे मोजावे लागणार Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात दुपटीने वाढ, शेअर प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, प्राईस बँड सह डिटेल्स जाणून घ्या Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर फोकसमध्ये, चॉइस इक्विटी ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

Trending Video | फिरायला गेलेले जोडपे अडकले लांडग्यांच्या विळख्यात, पुढे असं घडलं की विश्वास बसणार नाही, पहा व्हिडिओ

Trending Video

Trending Video | बरेच जोडपे एकमेकांना वेळ देण्यासाठी किंवा एकमेकांचा खास दिवस साजरा करण्यासाठी नाईट आऊट प्लॅनिंग करताना पाहायला मिळतात. यासाठी बरेचजण बाहेरच्या ठिकाणी नवीन जागा देखील बुक करतात. परंतु बाहेरच्या ठिकाणांची पुरेपूर माहिती नसल्यामुळे अनेक जोडपे छोट्या मोठ्या संकटात अडकतात. आपण अशा पद्धतीचे व्हिडिओ आतापर्यंत अनेक वेळा पाहिले असतील. परंतु आज आम्ही एका भय्यावय व्हिडिओ बद्दल सांगणार आहोत. हा व्हिडिओ पाहून भल्या भल्यांच्या अंगावर काटा येईल.

सोशल मीडियावर जोडप्यांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जोडप्यांना चक्क 10 लांडग्यांनी घेरलं आहे. काळजात धडकी भरवणारा हा व्हिडिओ पाहून तुम्ही सर्वच जण हक्के बक्के व्हाल. लांडगा हा जंगली प्राणी असून अतिशय चतुर आणि तितकाच जीव घेणा प्राणी आहे. लांडग्यांसाठी संपूर्ण माणूस फाडून खाणे देखील अतिशय सोपे असते. त्यामुळे आपल्या समोर आपल्या डोळ्यात डोळे घालून लांडगा उभा असेल तर, आपलं त्यावेळी काय होईल हा विचार करूनच अंगावर सरकन काटा येत आहे.

वाढदिवसानिमित्त बाहेर गेलेले जोडपे अडकले लांडग्यांच्या वीळख्यात :
वायरल झालेला व्हिडिओ कॅनडा क्युबिक येथील असून एका केबिनमध्ये कपल आपला वाढदिवस साजरा करत होते. अचानक त्यांच्या काचेच्या भिंतीजवळ तब्बल 10 लांडग्यांनी एकाच वेळी अटॅक केला. भिंत काचेची असल्यामुळे लांडग्यांना आत येता आलं नाही. 33 वर्षांचे मीची जुल्स आणि त्यांची पत्नी असे हे जोडपे आपला कॉलिटी टाईम एकमेकांबरोबर घालवत होते. दरम्यान त्यांना मध्यरात्री चक्क लांडग्यांबरोबर राहावं लागलं.

व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे केबिनमध्ये असणाऱ्या व्यक्तीने त्याचा मेन दरवाजा देखील उघडला आहे. दरवाज्याच्या बाहेर देखील अनेक लांडगे उभे होते. ते लांडगे जोरजोरात ओरडत देखील होते. परंतु एकाही लांडग्याने त्यांच्यावर जीव घेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला नाही. या दरम्यानची पोस्ट शेअर करत कपलने स्वतःचा अनुभव देखील शेअर केला आहे.

कपलने शेअर केला अनुभव :
कपलने लांडग्यांबरोबरचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी त्यांच्या अकाउंटवर पोस्ट करत लिहिलं की,”या प्राण्यांना जवळून पाहण्याचा एक्सपिरीयन्स अतिशय रंजकदार होता. मला प्राण्यांविषयी अधिक प्रेम आहे त्यामुळे त्यांचा हा संपूर्ण व्हिडिओ माझ्या कॅमेरात कैद करण्यात मला उत्सुकता वाटली”. ” माझा विश्वास बसत नाहीये की, आम्ही एवढे भाग्यशाली आहोत आम्हाला लांडग्यांना एवढ्या जवळून पाहता आलं”. पुढे त्याने लिहिलं की,”मी जेव्हा लांडग्यांसाठी दरवाजा उघडला तेव्हा त्यांनी अतिशय शांत प्रतिक्रिया दिली. त्यांचा हा शांतपणा पाहून मी अतिशय शॉक झालो”. या लांडग्यांमुळे मला कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागला नाही. अशा पद्धतीचं कॅप्शन युजरने लिहिलं आहे.

Latest Marathi News | Couple celebrate their birthday surrounded by wild wolves in the forest 17 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Trending Video(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x