15 December 2024 11:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

SIP Vs Bank RD | कोणती डिपॉझिट स्कीम जास्तीचा परतावा मिळवून देईल, माहिती समजून घ्या आणि योग्य ठिकाणी गुंतवा

SIP Vs Bank RD

SIP Vs Bank RD | सध्याच्या महागाईच्या जगात वावरत असताना प्रत्येक व्यक्तीला भविष्याची चिंता सतावत असते. यासाठी. आपल्या पगारातून काही रक्कम भविष्यातील अगदी कोणत्याही कारणांसाठी सहजपणे वापरता यावी यासाठी व्यक्ती गुंतवणुकीचे पर्याय शोधतो. परंतु मार्केटमध्ये सध्याच्या घडीला अनेक म्युच्युअल फंड किंवा इतर विविध प्रकारच्या डिपॉझिट स्कीम उपलब्ध आहेत.

अशावेळी प्रत्येक व्यक्ती आपल्याला जिथून जास्तीचा परतावा मिळेल अशी स्कीम शोधत असतो. ज्या गुंतवणुकीमधून आपल्याला अधिक फायद्याचा लाभ अनुभवता येतो. आज आम्ही तुम्हाला एसआयपी आणि बँक आरडी योजनेमध्ये प्रत्येक महिन्याला पुढील 5 वर्षांसाठी 5000 हजारांची रक्कम गुंतवली तर, तुम्ही 5 वर्षांत किती रुपयांचा फंड जमा करू शकता. आपण एसआयपी आणि आरडी दोघांचंही कॅल्क्युलेशन पाहणार आहोत. जेणेकरून तुम्हाला योग्य ठिकाणी पैसे गुंतवणे सोपे जाईल. त्याचबरोबर गुंतवणुकीची संपूर्ण माहिती देखील मिळेल. चला तर पाहूया.

5 वर्षांकरिता एसआयपीमध्ये गुंतवणूक केली तर किती फंड जमा होईल :
एसआयपीमध्ये गुंतवणूक करणे नागरिकांना फायद्याचे वाटते. आतापर्यंत अनेकांनी एसआयपीच्या माध्यमातून बक्कळ पैशांची कमाई केली आहे. समजा तुम्ही 5 वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 5,000 हजारांची गुंतवणूक करत असाल तर, यामध्ये तुम्हाला कंपाऊंडिंगचा फायदा मिळतो. एकूण पाच वर्षांत तुमच्या खात्यात 5 हजारांच्या हिशोबाने 3,00,000 लाखांची रक्कम जमा होते. यामध्ये तुम्हाला एकूण 12 टक्क्यांने व्याजदर प्रदान केले जाते. म्हणजेच 5 वर्षानंतर तुमच्या खात्यात 4,12,432 रुपयांचा फंड जमा होईल. यामधील तुम्हाला मिळणारे रिटर्न 1,12,432 रुपये एवढं असेल.

5 वर्षांकरिता RD मध्ये गुंतवणूक केली तर किती फंड जमा होईल :
आरडी योजनेसाठी गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये किंवा बँकेमध्ये जाऊन खातं उघडावं लागेल. आरडीमध्ये 5 वर्षांसाठी प्रतिमाहा 5 हजार रुपयांची गुंतवणूक केली तर, मॅच्युरिटीपर्यंत 3 लाखांचा फंड तयार होईल. या स्कीममध्ये 6.7% व्याजदर दिले जाते. व्याजाच्या हिशोबाने संपूर्ण 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुमच्या खात्यात व्याजासकट 3,56,830 एवढी रक्कम जमा होईल. म्हणजेच व्याजाची रक्कम 56,830 एवढी असेल.

महत्त्वाचं :
बऱ्याच गुंतवणूकदारांना एक गोष्ट माहीत नसते ती म्हणजे आरडी स्कीममधून मिळणारे रिटर्न हे फिक्स्ड रीटर्न असते परंतु एसआयपीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर मिळणारं रिटर्न फिक्स्ड नसते. त्यामुळे योजनांबद्दलची सर्व माहिती घेऊनच तुम्ही गुंतवणुकीचा विचार करा.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | SIP Vs Bank RD 17 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#SIP Vs Bank RD(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x