15 August 2022 1:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Xiaomi CyberOne Robot | शाओमीने तयार केला स्मार्ट रोबोट, काम करताना मनुष्याच्या भावनेनुसार विचार करू शकणार Multibagger Mutual Funds | या 3 जबरदस्त मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना लक्षात ठेवा, SIP ने 3 वर्षात लाखोंचा फायदा Horoscope Today | 15 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 2023 Kia Ray | 2023 किआ रे कार लाँच, जबरदस्त लूकसह मिळणार शानदार असे फीचर्स Viral Video | तो बाईक सहित खड्ड्यात पडला की खड्ड्यातून वर आला?, विचित्र अपघाताचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय अमित शहांनी फडणवीसांना उपमुख्यमंत्री बनवलं | तर फडणवीसांनी मुनगंटीवार आणि चंद्रकांतदादांचं राजकीय वजन घटवलं शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचं खातेवाटप | दादा भुसेंकडून कृषी खातं सत्तारांकडे, शिंदेंकडून मूळ शिवसैनिकांना हलकी खाती
x

जन्मभूमी कर्मभूमी आहे ही, आई आहे ही, खाऊन भरल्या ताटात... - केदार शिंदेंकडून संताप

Kedar Shinde, Kangana Ranaut, Mumbai Pok, Marathi News ABP Maza

मुंबई, ३ सप्टेंबर : कंगनाने ट्विट करत आरोप केला होता, की ‘मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्यास पुन्हा शहरात येऊ नकोस, असे म्हणत मला राऊत यांनी खुली धमकी दिली. आधी झळकलेले आझादीचे फलक आणि आता मिळत असलेल्या उघड धमक्या यांमुळे मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे?,’ असा सवाल कंगनानं ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला होता.

त्यानंतर सर्वच स्तरातून तिच्यावर टीका होत आहे. दिग्दर्शक केदार शिंदे यांनीदेखील कंगनाच्या या ट्विटवरून संताप व्यक्त केला आहे. “या मुंबईने कित्येक लोकांना डोक्यावर घेतले आणि कित्येकांना पायदळीही तुडवलं! जन्मभूमी कर्मभूमी आहे ही. आई आहे ही. खाऊन भरल्या ताटात……निषेध,” असं म्हणत केदार शिंदे यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून संताप व्य केला होता. तर दुसरीकडे अभिनेता स्वप्नील जोशी यानंदेखील कंगनाच्या वक्तव्यावरून “आय लव मुंबई” असं ट्विट केलं आहे.

तत्पूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत आणि अभिनेत्री कंगना रणौत यांच्या वादात आता आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्ता प्रीती शर्मा मेनन यांनी उडी घेतली आहे. कंगनाने संजय राऊतांवर ट्विट करत केलेल्या आरोपावरून प्रीती शर्मा भडकल्या आहेत. त्यांनी कंगनावर निशाणा साधताना, “ज्या मुंबईत स्वतःच करियर बनवलं त्या मुंबईलाच पाकिस्तान म्हणताना तुला लाज कशी नाही वाटली?” असा प्रश्न विचारला होता.

 

News English Summary: Shiv Sena leader MP Sanjay Raut had told Kangana about Kangana’s remarks about Maharashtra Police. He had also said that if she was scared in Mumbai, she should not come back. After that, Kangana, while replying to Sanjay Raut, compared Mumbai to Pakistan-occupied Kashmir. Since then, she has been criticized from all levels. Director Kedar Shinde has also expressed anger over Kangana’s tweet.

News English Title: Marathi Industry Director Kedar Shinde Slams Kangana Ranaut Tweet Shiv Sena Sanjay Raut Mumbai Pok Marathi News LIVE Latest Updates.

हॅशटॅग्स

#MarathiCinema(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x