17 May 2021 3:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
देशात वादळ आणि कोरोना आपत्ती | त्यात अमृता फडणवीस यांचं सूचक नव्हे तर 'निरर्थक ट्विट' केंद्राने जगभरात लसी फुकट वाटल्या, त्यांच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागतंय - रुपाली चाकणकर संपूर्ण पोलीस दल कोरोना आपत्तीत लोकांसाठी कर्तव्यावर | तर राज्याचे पोलीस महासंचालक सुट्टीवर प. बंगाल | सीबीआय'च्या TMC नेत्यांवर धाडी, ममता बॅनर्जी थेट CBI कार्यालयात प. बंगालच्या राज्यपालांकडून खटला दाखल करण्याची परवानगी घेत TMC नेत्यांवर सीबीआयच्या धाडी गेल्या २४ तासांत २ लाख ८१ हजार ३८६ नवे कोरोना रुग्ण | ४,१०६ रुग्णांचा मृत्यू हट्टी मोदी सरकार वैज्ञानिकांचे सल्ले देखील ऐकत नाहीत | डॉ. जमील यांचा कोरोना सल्लागार गट प्रमुख पदाचा राजीनामा
x

कंगना म्हणजे भाजप IT सेल | कंगनाच्या ट्विट, वक्तव्यांमागे भाजपा आहे - काँग्रेस

Congress leader Sachin Sawant, BJP MLA Ram Kadam, Kangana Ranaut, Marathi News ABP Maza

मुंबई, ४ सप्टेंबर : ‘कंगना म्हणजे भाजप आयटी सेल’ अशी टीका काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे. कंगनाने मुंबईबद्दल जे वक्तव्य केलं त्यामुळे तिच्यावर आता बॉलिवूड पाठोपाठ राजकीय वर्तुळातूनही टीका होत आहे. काँग्रेसचे सचिन सावंत यांनी कंगनावर टीका करत देवेंद्र फडणवीसांनी राज्याची माफी मागावी अशी टीका देखील केली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

सचिन सावंत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, कंगना टीम म्हणजे “कंगना+भाजप IT सेल” असून कंगनाच्या ट्विट, वक्तव्यांमागे भाजपा आहे. या कृतघ्न महिलेच्या साथीने राम कदम यांनी महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेचा, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील १०६ हुतात्म्यांचा, राणी लक्ष्मीबाईंचा व आमची मुंबईवर प्रेम करणा-या सर्वांचा घोर अपमान केला आहे”.

काय म्हणाले होते सचिन सावंत?
विवेक मोईत्रा यांच्यापासून राम कदम यांना ड्रग विक्री पुरवठ्याबाबत माहिती आहे. त्यांचे बॉलिवूड संबंधही घनिष्ठ आहेत. त्यामुळे त्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी आम्ही करत आहोत. भाजपा कार्यालयात ५३ वेळा फोन करून संदीप सिंग कोणाशी बोलत होता व भाजपाचे ड्रग माफिया संबंध ही उघड होतील. महाराष्ट्र ही शिवरायांची भूमी आहे. महाराष्ट्राचा सातत्याने जाणिवपूर्वक अपमान भाजपा करत आहे. अजूनही भाजपाने कंगनाचा निषेध केला नाही. कंगना व राम कदम यांचे बोलविते धनी असलेल्या देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रद्रोही भाजपाने विनाशर्त महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी ही आमची मागणी आहे. कंगना टीम म्हणजे “कंगना+भाजप IT सेल” कंगनाच्या ट्वीट, वक्तव्यांमागे भाजपा आहे. या कृतघ्न महिलेच्या साथीने राम कदम यांनी महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेचा, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील १०६ हुतात्म्यांचा, राणी लक्ष्मीबाईंचा व आमची मुंबईवर प्रेम करणा-या सर्वांचा घोर अपमान केला आहे असा आरोप सचिन सावंत यांनी केला होता.

 

News English Summary: Congress spokesperson Sachin Sawant has accused BJP of calling Kangana rich. Kangana team is Kangana, BJP, IT cell and BJP is behind Kangana’s tweets, statements, he tweeted.

News English Title: Congress leader Sachin Sawant On BJP Ram Kadam Kangana Ranaut Marathi News LIVE Latest Updates.

हॅशटॅग्स

Bollywood(77)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x