21 January 2025 1:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Vs PPF Scheme | सर्वाधिक पैसा कुठे मिळेल, वार्षिक 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून कुठे अधिक परतावा मिळेल Wipro Share Price | आयटी शेअरमध्ये सुसाट तेजीचे संकेत, विप्रो शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: WIPRO IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, PSU स्टॉक फोकसमध्ये, तेजीचे संकेत - NSE: IREDA HFCL Share Price | एचएफसीएल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HFCL Quant Mutual Fund | पगारदारांसाठी मार्ग श्रीमंतीचा, फंडाची ही योजना 4 पटीने पैसा वाढवते, संधी सोडू नका Jio Finance Share Price | तेजीने कमाई होणार, जिओ फायनान्शियल शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करतोय, तेजी कायम राहणार का, ब्रोकरेज बुलिश - NSE: APOLLO
x

Bigg Boss Marathi | झापूक-झुपुक अंदाज! 'हे घे चॉकलेट माझा बच्चा', सूरजने हाणला होता गुलिगत अंदाजात प्रपोज - Marathi News

Bigg Boss Marathi

Bigg Boss Marathi | बिग बॉसच्या घरामधील निरागस सदस्य सुरज चव्हाण हा टॉप 10 च्या लिस्टमध्ये असलेला सदस्य आहे. त्याच्या साधे भोळेपणामुळे आणि झापूक-झुपुक अंदाजामुळे त्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. बिग बॉसचा खेळ पाहता घरातील सर्व सदस्यांच असं म्हणणं आहे की, सुरजला अजून सुद्धा बिग बॉस गेम समजण्यासाठी अडचणी निर्माण होतात.

परंतु सुरजच्या चहात्यांनी त्याला भरभरून वोट करून टॉप 10 लिस्टमध्ये आणून ठेवलं आहे. दरम्यान सुरज हा या आठवड्याचा कॅप्टन देखील झाला आहे. त्यामुळे सगळीकडे फक्त सुरजचीच वाह वाह पाहायला मिळते. दरम्यान सुरजच्या प्रेमाविषयीच्या गप्पादेखील फारच रंजक असतात. प्रेक्षकांना सुरजच्या गुलीगत प्रेमाबद्दल जाणून घ्यायला फार आवडते. त्याने त्याच्या प्रेमाविषयी काही वक्तव्य केली आहेत. सोबतच आपले प्रेमिकाला हटके अंदाजामध्ये कसा प्रपोज हाणला याबद्दल देखील त्याने सांगितलं आहे.

असा पडला सुरज तिच्या प्रेमात
पंढरीनाथ सुरजला बोलकं करण्यासाठी काही ना काही प्रश्न विचारतच असतात. दरम्यान त्यांनी त्याच्या प्रेमाविषयी प्रश्न विचारला. पॅडी भाऊंनी विचारलं की, तुला कसं माहिती, ती तुला बघून लाईन देत होती? तेव्हा सुरज धमाकेदार उत्तर देत म्हणाला की,’आम्ही फक्त एकमेकांकडे पाहायचो, मग मी तिला सांगितलं तू मला खूप आवडते पण हा सीन मधला डायलॉग होता मला तिला प्रपोज हाणायचा होता. मला तिच्या हातामध्ये गुलाबाचं फुल द्यायचं होतं. मी तिला म्हणालो तू माझ्यासाठी लई स्पेशल आहेस हे घे स्पेशल चॉकलेट. माझा बच्चा…’. असं सुरजने सांगितलं.

नंतर पॅडी भाऊंनी तिचं काय उत्तर होतं? असा प्रश्न केला. त्यावर सुरज म्हणतो की, ती म्हणाली मला दुसरा मुलगा आवडतो. मग माझ्या दिलाचे चुरचुर तुकडे झाले. सुरज, अंकिता आणि पॅडी भाऊंचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल झाला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट देखील केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

बिग बॉसच्या घरात वाहताहेत आनंदाचे वारे
बिग बॉसच्या घरात सध्या आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. संपूर्ण जगभरात लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे. अशातच बिबींच्या घरामध्ये देखील गणेशोत्सव अगदी थाटामाटात आणि जल्लोषात साजरी होताना पाहायला मिळतोय. अशातच रितेश यांनी भाऊच्या धक्क्यावर घरातील सदस्यांना वेगवेगळे धक्के देखील दिले आहेत. सोबतच रितेशच्या पत्नीने म्हणजेच जेनिलियाने घरातील सर्व सदस्यांसाठी बाप्पांचा आवडता पदार्थ म्हणजे मोदक रितेशजवळ पाठवून दिले आहेत. अरबाजने स्टोररूममधून मोदक आणून सर्वांना वाटले सर्वांनी मोदक खायला देखील सुरुवात केली.

परंतु आपल्या लाडक्या सुरजने बाप्पांवरचं अधिक प्रेम दाखवत सर्वात पहिला मोदक स्वतः न खाता बाप्पांसमोर ठेवला आणि आशीर्वाद घेऊन स्वतःचा मोदक खाल्ला. त्याच्या या कृत्यामुळे त्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्याची पुन्हा एकदा बाजी मारली आहे.

Latest Marathi News | Bigg Boss Marathi 09 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Bigg Boss Marathi(34)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x