6 October 2022 7:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Surya Rashi Parivartan | ज्योतिषशास्त्रानुसार येणारे 11 दिवस या राशींच्या लोकांसाठी वरदानासारखे असतील, सूर्य राशी परिवर्तनाचा परिणाम Trending Video | शिकार पाहिली आणि अजगराने झाडावर वेगाने चढत हल्ल्याची तयारी केली, व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल Penny Stocks | या शेअरने हजारो पटीत परतावा, 3 वर्षांत एक लाखावर 1 कोटी 25 लाखाचा परतावा दिला, स्टॉक नेम नोट करा Horoscope Today | 07 ऑक्टोबर 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bigg Boss 16 | 'बिग बॉस 16' मध्ये इंस्टाग्राम फेम किली पॉलची होणार वाइल्ड कार्ड एण्ट्री, व्हिडीओ व्हायरल Multibagger Stocks | मागील दसऱ्याला या 44 शेअर्समध्ये लोकांनी पैसे गुंतवले, या दसऱ्याला मल्टिबॅगर परतावा मिळाला, स्टॉकची यादी सेव्ह करा Numerology Horoscope | 07 ऑक्टोबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या
x

आदित्य ठाकरेंबाबत रिया चक्रवर्तीकडून अधिकृत खुलासा | वकिलांमार्फत निवेदन प्रसिद्ध

Minister Aadityta Thackeray, Rheas Chakroborthy, Sushant Singh Rajput

मुंबई, १८ ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजूपत याच्या आत्महत्येनंतर देशभर वादळ निर्माण झालं. सुशांतच्या कुटुंबासह भाजपने या प्रकरणाच्या तपासाबाबत मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. महाराष्ट्र सरकारमधील एका युवा मंत्र्यांच्या दबावामुळे सुशांत आत्महत्या प्रकरणात योग्य दिशेने तपास होत नसल्याचा आरोप करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्यात आला. त्यामुळे आदित्य ठाकरे आणि सुशांतची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्तीची भेट झाली का, याबाबत चर्चा सुरू होती. मात्र आता याप्रकरणी अखेर रिया चक्रवर्तीने खुलासा केला आहे.

आदित्य ठाकरेंना मी कधीही भेटले नाही, असं रियानं निवेदनात म्हटलं. तिचे वकील सतीश माने शिंदेंनी हे निवेदन प्रसिद्ध केलं आहे. ‘आदित्य ठाकरे कोण आहेत हे रियाला माहीत नाही. ती त्यांना कधीही भेटलेली नाही. तिनं त्यांच्यासोबत फोनवरून किंवा इतर कोणत्याही माध्यमातून कधीही संवाद साधलेला नाही,’ असं स्पष्टीकरण रियाच्या वतीनं माने शिंदेंनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात आहे.

सुशांत आणि रियाच्या नात्याची सुरुवात कशी झाली, याचाही माहिती निवेदनात आहे. ‘एकाच क्षेत्रात काम करत असल्यानं सुशांत आणि रिया एकमेकांना काही वर्षांपासून ओळखायचे. त्यांच्यात मैत्रीचे संबंध होते. ते एकमेकांशी अधूनमधून बोलायचे. एप्रिल २०१९ मध्ये सुशांत एका पार्टीला गेला होता. त्यानंतर रिया आणि सुशांतनं डेट करण्यास सुरुवात केली. एकमेकांच्या घरात बरेच दिवस सोबत राहिल्यानंतर दोघे डिसेंबर २०१९ मध्ये वांद्र्यातल्या माऊंट ब्लँकमध्ये राहायला गेले. ८ जून २०२० पर्यंत रिया तिथे वास्तव्यास होती,’ असा तपशील निवेदनात आहे.

 

News English Summary: Actress Rhea Chakraborty’s lawyer Adv Satish Mane Shinde in a media statement on Tuesday claimed that Rhea never met Shiv Sena scion Aditya Thackeray. Several claims regarding Aaditya Thackeray’s connection with Sushant’s death are being made. The statement makes an effort to dismiss all those claims. In a long statement, Shinde, on Rhea’s behalf, said, “Rhea does not know and has never met Aditya Thackeray. Neither has she ever spoken to him telephonically or otherwise.”

News English Title: Never met minister Aadityta Thackeray or spoke case is all about politics now statement by Rheas Chakroborthy legal team News Latest Updates.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x