15 December 2024 3:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

मध्य प्रदेशात भाजपचा मनसेबाणा | राज्यात सरकारी नोकरी फक्त भूमिपुत्रांनाच

Madhya Pradesh, CM Shivraj Chouhan, Government Jobs For Locals Only

भोपाळ, १८ ऑगस्ट : मध्य प्रदेशमधल्या शिवराजसिंह चौहान यांच्या भाजप सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात आता सरकारी नोकरी ही फक्त स्थानिक तरुणांनाच मिळेल अशी घोषणा चौहान यांनी केली आहे. लवकरच असा कायदा करण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हाच भूमिपूत्राचा मुद्दा मांडत असतात. त्यामुळे भाजप सरकारने राज ठाकरे यांच्या धोरणासारखीच ही घोषणा केल्याचं बोललं जातं आहे.

चौहान म्हणाले जे राज्याचे रहिवाशी आहेत त्यांनाच फक्त आता राज्यात सरकारी नोकऱ्या मिळतील. इतरांना मिळणार नाहीत. राज्यातल्या तरुणांना रोजगार मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. “मध्य प्रदेश सरकारने आज महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील तरुणांनाच सरकारी नोकरी मिळावी यासाठी आम्ही कायदेशीर पाऊलं उचलणार आहोत. राज्यातील संसाधनं फक्त मध्य प्रदेशातील मुलांनाच मिळाली पाहिजेत,” असं शिवराज सिंग यांनी म्हटलं आहे.

शिवराज सरकारकडून येणाऱ्या नव्या कायद्यांतर्गत 15 ऑगस्ट 2020 पर्यंत 89 निश्चित केलेल्या भागांतील अनुसूचित जमातीच्या नागरिकांना लायसन नसलेल्या सावकाराकडून घेतलेले कर्ज फेडावे लागनार नाही. आता सावकारांना कर्ज भरण्यासाठी दबावही टाकता येणार नाही. एवढेच नाही, तर कर्जाच्या बदल्यात काही वस्तू अथवा दस्तऐवज गहाण ठेवले असतील तर तेही त्यांना परत करावे लागतील.

 

News English Summary: Government jobs in Madhya Pradesh will be reserved for the people of the state, Chief Minister Shivraj Singh Chouhan said today, announcing a decision that could be controversial at a time thousands across the country are facing a job crisis during the coronavirus pandemic.

News English Title: Madhya Pradesh CM Shivraj Chouhan Says Government Jobs For Locals Only News Latest Updates.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x