23 March 2023 4:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Indigo Paints Share Price | हा शेअर 50 परतावा देईल, मोतीलाल ओसवाल फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, फायदा उचला Gratuity Calculator | तुम्ही 7 वर्षे नोकरी केली असेल तर तुम्हाला किती लाख ग्रॅच्युइटीची रक्कम मिळेल? गणित जाणून घ्या SBC Exports Share Price | या पेनी शेअरमध्ये वाढ होतेय, शेअरची किंमत 17 रुपये, गुंतवणुक करण्याआधी डिटेल्स वाचा Sula Vineyards Share Price | दारू नव्हे तर या दारू कंपनीच्या शेअरची खरेदी करा, स्टॉक मजबूत परतावा देईल, डिटेल्स पहा SBI Share Price | सरकारी एसबीआय बँकेचा शेअर तेजीत येतोय, शेअरची वाटचाल आणि टार्गेट प्राईस पाहून घ्या Bombay Super Hybrid Seeds Share Price | या शेअरने 6 महिन्यात 278 टक्के परतावा दिला, आता स्टॉक रोज अप्पर सर्किटवर, पैसे लावणार? Evexia Lifecare Share Price | इव्हेक्सिया लाइफकेअर शेअर प्राईस टार्गेट 2023, 2024, 2025, 2030 पर्यंत किती असेल?
x

हे वर्ष अधिक जीवघेणं असेल | महामारीच्या या वर्षात अधिक लोकांचे जीव जातील - WHO

India corona pandemic

नवी दिल्ली, १५ मे : | कोरोना महामारी येऊन एक वर्षा लोटले आहे. या काळात अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावले आहे, पण यातील अनेकांच्या मृत्यूची सरकारी आकडेवारीत नोंदच झालेली नाही. असे यामुळे, कारण अनेक मोठ्या देशांनी मृतांचा खरा आकडा जगापासून लपवला असल्याचा दावा वॉशिंग्टन यूनिव्हर्सिटीच्या हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्यूएशन इंस्टीट्यूटच्या विश्लेषणात करण्यात आला आहे. यात सांगितल्यानुसार, रशियात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची आकडेवारी सरकारी आकडेवारीपेक्षा 5 पट जास्त आहे. तसेच, भारत आणि मेक्सिकोमध्येही सरकारी आकडेवारीपेक्षा 2 पट जास्त मृत्यू झाले आहेत. तर संपूर्ण, जगात सरकारी आकडेवारीपेक्षा 113% जास्त मृत्यू झाले आहेत.

जगात आणि देशात अशी बिकट परिस्थिती असताना जागतिक आरोग्य संघटनेचे डायरेक्टर टेड्रोस अनाधोम यांनी एक गंभीर इशारा दिला आहे. कोरोना महामारीचं दुसरं वर्ष आणखी भयंकर असेल. पहिल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षात अधिक लोकांचे जीव जातील. त्यामुळे हे वर्ष अधिक जीवघेणं असेल, असा धोक्याचा इशारा डब्ल्यूओचे डायरेक्टर टेड्रोस अनाधोम यांनी दिला. कोरोना महामारीचं स्वरुप अधिक तीव्र होत असून त्यामुळे दुसऱ्या वर्षात कोरोनाचा विषाणू अधिक जीवघेणा होईल, असं टेड्रोस म्हणाले. श्रीमंत देशांनी आता सर्व लहानग्यांना लस टोचण्याऐवजी कोवॅक्सचे डोस दान करावेत, असं आवाहन त्यांनी केलं.

जागतिक आरोग्य संघटनेचे डायरेक्टर टेड्रोस अनाधोम यांनी एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संवाद साधला. काही देश त्यांच्याकडील लहानग्यांना लस देऊ इच्छितात. त्यांच्या भावना मी समजू शकतो. पण त्यांनी या गोष्टीचा पुनर्विचार करावा आणि त्याऐवजी कोवॅक्सला लसी दान कराव्यात, असं आवाहन त्यांनी केलं.

कोवॅक्स फॅसिलिटी कोरोना लसींसाठी तयार करण्यात आलेलं एक जागतिक सहयोगी संघटना आहे. कोरोना लसींचं उत्पादन, संशोधन आणि ती प्रत्येकापर्यंत पोहोचावी यासाठी ही संघटना काम करते. या संघटनेचं नेतृत्व GAVI कडून केलं जात आहे.

 

News English Summary: The second year of the Corona epidemic will be even more devastating. More lives will be lost this year than in the first. Therefore, this year will be more life threatening, warned Tedros Anadhom, Director of WHO. As the Corona epidemic intensifies, the Corona virus will become more deadly in the second year, Tedros said. He called on rich countries to donate doses of covacs to all children instead of vaccinating them.

News English Title: This year more peoples will dead than first wave of corona said World Health Organization director Tedros Adhanom news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x