15 December 2024 1:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

Bigg Boss Marathi | बिग बॉस ये दिल मांगे More! वाइल्ड कार्ड एन्ट्रीनंतर अभिनेत्याच्या या पोस्टकडे वळालं सर्वांचं लक्ष - Marathi News

Bigg Boss Marathi

Bigg Boss Marathi | मराठी बिग बॉसचा सातवा सिझन सुरू झाला असून प्रेक्षकांमध्ये शो पाहण्याची इच्छा आणखीनच वाढीला लागली आहे. दरम्यान बॉडी बिल्डर संग्राम चौगुले याच्या घरात येण्याचा चांगलाच परिणाम सदस्यांवर झालेला पाहायला मिळतोय. संग्रामने घरात एन्ट्री केल्याबरोबर त्याला एक टास्क दिला गेला. यामध्ये बिग बॉस यांनी सांगितलेल्या तरतुदीनुसार दोन सदस्यातून एका सदस्याची निवड करून नावडता सदस्य स्विमिंगपूलमध्ये ढकलायचा होता.

संग्रामने योग्य कारण देत अंकिता आणि अरबाज यांना पाण्यामध्ये ढकललं त्यानंतर निकीची बारी आली. पाण्यात उडी मारायला नको म्हणून निकीने चांगलाच ड्रामा सुरू केला. एवढेच नाही तर संग्रामला देखील उलट पालट बोलणं केलं. शेवटी संग्रामने चिडून निखिला पाण्यात ढकलून दिल. त्यानंतर निकिता फारच जळफळाट झाला. बिग बॉसच्या या वाइल्ड कार्ड एन्ट्रीनंतर अभिनेता अभिजीत केळकर याने एक खास पोस्ट केली आहे. या पोस्ट कडे अनेकांचे लक्ष वळालं आहे.

अभिजीतने राखी सावंतला घरामध्ये पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याने, “…Bigg Boss ये दिल मांगे more… खोकल्यावर उपाय केलात, पण “नाक” अजून फुरफुरतंय आता सर्दी घालवायला bring back राखी’. अशी पोस्ट केली आहे. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट देखील केल्या आहेत. एक म्हणतोय ‘जाळ आणि धूर काढेल त्या निक्कीचा राखी’, ‘तर दुसरा म्हणतोय तीन दिवस घेऊन या राखीला मॅटर चालू बत्ती गुल’. तर तिसऱ्याने अशी कमेंट केलीय की, ‘खरंय रे.. मॅडमना असं वाटतं, मी म्हणजे एकदमच भारी.. बाकी सगळे घागऱ्यातून पडलेले… राखी आली ना तर उरलेला संपूर्ण सीजन आर्टिफिशल नाकवाल्या बाईंना नाक नाही राहणार घरात’. अशा पद्धतीच्या कमेंट्स पोस्टला आल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhi Kelkar (@abhijeetkelkar21)

मागील आठवड्यात पुढारी म्हणजेच घनश्याम दरोडे घराबाहेर पडले. आता या आठवड्यात घराची एक्झिट कोण घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. नवीन सदस्याच्या येण्याने घरामध्ये दोन्हीही टीम्सचे वेगवेगळे प्लॅन सुरू झाले आहे. या सर्वांची केमिस्ट्री पाहून प्रेक्षकांना मजा येत आहे.

Latest Marathi News | Bigg Boss Marathi 2 fame Abhijeet Kelkar shared post after BBM 5 wild card entry of Sangram Chougule 11 September 2024 Marathi News.

 

हॅशटॅग्स

#Bigg Boss Marathi(34)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x