15 December 2024 3:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

Priyanka Chopra | प्रियांकाचा मिस वर्ल्ड किताब आधीच फिक्स झाला होता? प्रतिस्पर्धीने केला मोठा खुलासा

Priyanka Chopra

Priyanka Chopra | बॉलिवूडसह हॉलिवूडवर आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राने आपल्या अभिनयाच्या जोरावर मोठा चाहता वर्ग गोळा केला आहे. २००० साली मिस वल्डची ती मानकरी ठरली. त्यानंतर तिने आपल्या आयुष्याचे जहाज अभिनयाच्या दिशेने फिरवले. प्रियांका तिच्या विचारांमुळे आणि परखड मतांमुळे देखील चर्चेत असते. अशात आता नुकताच मिस यूएसए स्पर्ध्येचा निकाल लागला यात बोनी गॅब्रिएलने विजय मिळवला. यानंतर अभिनेत्री प्रियांका चोप्रा चांगलीच चर्चेत आली आहे. तिने साल २००० मधील मिस वर्ल्डचा किताब जिंकला. मात्र आता तिच्या या विजायाची चर्चा अधिक होताना दिसत आहे.

माजी मिस लीलानी मॅककॉनीने आता प्रियांकाच्या विजयावर प्रश्न उपस्थीत केला आहे. २००० च्या मिस वर्लड स्पर्धेत लीलानी देखील सहभागी झाली होती. सध्या ती एक युट्यूबर म्हणून प्रसिध्द आहे. तर आता तिने प्रियांच्या मिस वर्लड विजयावर एका व्हिडीओत काही भाष्य केलं आहे. तिने म्हटलं आहे की, या स्पध्येत प्रियांका फिक्स होती. तिला पूर्ण वेळ विशेष वागणूक दिली गेली.

तिचे म्हणणे हे की प्रियांकाने फसवणूक करुण हा किताब जिंकला आहे. मात्र प्रियांकाचे नाव तिने आताच का घेतले असा प्रश्न देखील वर येत आहे. कारण ही स्पर्धा होउन आता जवळपास २२ वर्षांचा काळ लोटला आहे. तर नुकतीच मिस युएसए ही स्पर्धा झाली. यात वजयी झालेल्या स्पर्धाकावरून वाद रंगला. सोशल मीडियावर सौंदर्याच्या या स्पर्धा फिक्स असतात असे अनेक नेटकरी म्हणू लागले. त्यामुळे लीलानीने देखील प्रियांकावर निशाना साधला आहे.

लीलानी आपल्या व्हिडीओमध्ये म्हणते की, “ प्रियांका तेव्हा स्पर्धेतील इतर मुलींना अजीबात आवडत नव्हती. ती तिची स्कीन टोन निट करण्यासाठी एक क्रिम वापरत होती. मात्र त्याचा तिला काही फायदा होत नव्हता. त्यावेळी कुणालाच सारेंग ( कमरेवर बांधले जाणारे स्कार्फ) बांधण्याची परवाणगी नव्हती मात्र प्रियांकाने त्याचा वापर केला होता आणि तिला कोणीही काहीही टोकले नाही. “

“जेव्हा आम्ही सर्व एकत्र होतो तेव्हा आम्हाला आयोजकांकडून साधारण वागणूक दिली जात होती. मात्र प्रियांकाला नेहमीच स्पेशल वागणूक होती. तिला नाष्टा आणि जेवण तिच्या बेडवर दिले जात होते. तसेच आमचा सगळ्यांचा एकच डिझायनर होता. त्याने आमचे कपडे अजिबात व्यवस्थीत शिवले नव्हते. प्रियांकाचे कपडे त्यान खुप छान फिटींगमध्ये शिवले होते. आमच्या बरोबर भेदभाव केला जात होता. “ असे तिचे म्हणणे आहे.

आता तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अनेक नेटकरी यावर विविध कमेंट करत आहेत. यात प्रियांकाचे चाहते तिची बाजू घेत आहेत. मात्र अजुन या आरोपांवर प्रियांकाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Priyanka Chopra’s Miss World title was already fixed the rival criticized 04 November 2022.

हॅशटॅग्स

#Priyanka Chopra(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x