10 December 2024 8:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
CIBIL Score | तुमच्याकडे सुद्धा एकापेक्षा अधिक पॅन कार्ड आहेत मग, तुमच्या क्रेडिट स्कोरवर होणार हा परिणाम - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेच्या तात्काळ तिकीट बुकिंगच्या वेळेत आणि नियमांमध्ये मोठा बदल; ही अपडेट ठाऊक आहे का Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, स्टॉक चार्टवर संकेत, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या Redmi Note 14 | Redmi Note 14 सिरीजची भारतात एंट्री; या तारखेपासून खरेदी करता येईल, किंमत आणि फीचर्स पाहून घ्या IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ - GMP IPO BSNL Recharge | आता केवळ 58 रुपयांपासून मिळणार BSNL चे स्वस्तात स्वस्त प्लान; मोबाईल रिचार्जसाठी लक्षात ठेवा
x

Anushka Sen | अवघ्या 22 वर्षांत अभिनेत्रीने घराची स्वप्नपूर्ती केली साकार, गृहप्रवेशाचे फोटोज शेअर करत म्हणाली - Marathi News

Anushka Sen

Anushka Sen | सोशल मीडिया स्टार आणि प्रसिद्ध टेलिव्हिजन कलाकार अनुष्का सेन या अभिनेत्रीने अवघ्या 22 वर्षांत पताच्या हक्काच्या घराची स्वप्नपूर्ती साकार केली आहे. अभिनेत्रीचे वय अवघे 22 वर्ष असून तिने भलं मोठं घर विकत घेतलं आहे. तिच्या या धाडसाचं बरेचजण कौतुक करत आहेत.

अनुष्काने गृहप्रवेशादरम्यानचे फोटोज सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. फोटोजमध्ये दाखवल्याप्रमाणे अनुष्काचे कुटुंबीय देखील पूजा करताना दिसत आहेत.

अनुष्का सेनचा भरपूर मोठा चाहतावर्ग असून, तिची इंस्टाग्रामवर जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे. अनुष्का सेन ही लहान असल्यापासून रुपेरी पडद्यावर काम करत आहे. ती लहान असताना ‘बालवीर’ या मालिकेत झळकली. तिने बालवीर या मालिकेतून दमदार भूमिका साकारून अनेकांच्या मनावर राज्य केलं.

बालवीरनंतर अनुष्काने झांसी की रानी, फियर फॅक्टर: खतरो के खिलाडी, दिल दोस्ती डील्लेमा यासारख्या कार्यक्रमांमधून स्वतःची छबी उमटवली आहे. कमी कामगिरी आणि कमी वेळातच अनुष्काने प्रचंड फेम कमावला.

आता या लहान आणि तरुण अभिनेत्रीने स्वतःच्या घराची स्वप्नपूर्ती साकार केली आहे. तिने तिच्या घरातील कुटुंबीयांबरोबरचे अनेक फोटोज सोशल मीडिया हॅण्डलवर पोस्ट केले आहेत. यामध्ये अनुष्का तिचे आई-बाबा आणि आजोबा दिसून येत आहेत. दोघांनीही हातामध्ये नारळाचा तांब्या, आरतीचे ताट त्याचबरोबर फराळाचे काही पदार्थ हातामध्ये घेऊन फोटोज काढले आहेत.

अनुष्काळी फोटोज पोस्ट केल्याबरोबर तिला अनेकांनी भरभरून शुभेच्छा दिल्या. तिचं गोडकौतुक केलं. अनुष्काने तिच्या सर्व चाहत्यांना एवढ्या कमी वयात घर घेऊन दाखवून सुखद धक्का दिला आहे.

Latest Marathi News | Anushka Sen new home 30 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Anushka Sen(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x