तर तलवारी निघाल्या असत्या | व्यावसायिक लोकांमध्ये हिंदूंची जराही भीती नाही - मुकेश खन्ना
मुंबई, २९ ऑक्टोबर: बॉलीवूडमधील ‘खिलाडी’ अक्षय कुमार आणि कियारा आडवाणी यांचा मोस्ट अवेटेड ‘लक्ष्मी बम’ हा चित्रपट सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. ट्विटरवरही तो खूप ट्रेंड होत आहे. याचे कारण असे की, हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार असल्याचा दावा करण्यात येत होता. पण आता हा चित्रपट सिनेमागृहातच प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे समजते.
या चित्रपटांच्या निर्मात्यांच्या मते हा चित्रपट फक्त ऑनलाइन प्रदर्शित न होता सिनेमागृहातही प्रदर्शित व्हायला हवा. यापूर्वी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार असल्याची चर्चा होत होती. याबाबत खुद्द कियारा आडवाणी आणि अक्षय कुमार यांनी आपल्या सोशल नेटवर्किंग साइटवर पोस्ट करून दिली होती.
अक्षय कुमाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत दोन गोष्टींची गॅरंटी दिली होती. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होती की, ‘लक्ष्मी बम’चा पहिला शो आपण घरात बसून पाहाल. दुसरी गॅरंटी – आपण हसालही आणि घाबरालही. दरम्यान, या चित्रपटाची अक्षय कुमारचे चाहते मोठया उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
मात्र सध्या सिनेमाच्या टायटलवरूनही वाद सुरु झाला आहे. आता अभिनेते मुकेश खन्ना यांनीही अक्षयच्या या सिनेमावर आक्षेप घेत, चित्रपटाच्या टायटलची निंदा केली आहे. आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर मुकेश खन्ना यांनी अक्षयच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’चे पोस्ट शेअर केले. पण हे पोस्टर शेअर करताना त्यांनी चित्रपटाच्या नावाला विरोध केला.
काय म्हणाले मुकेश खन्ना?
‘लक्ष्मी बॉम्ब या नावाने कोणताही सिनेमा रिलीज व्हायला हवा? यावर देशभर वादविवाद सुरु आहे. काही लोक हा सिनेमा बॅन करण्याची मागणी करत आहेत. मला विचाराल तर बॅन योग्य नाही. कारण अद्याप कोणीच सिनेमा पाहिलेला नाही. केवळ ट्रेलर पाहिला आहे. मात्र फक्त टायटलची गोष्ट केलीच तर लक्ष्मीच्या पुढे बॉम्ब जोडणे खोडसाळपणा आहे. कमर्शिअल इंटरेस्ट हाच एक विचार यामागे असल्याचे वाटते. चित्रपटाच्या या नावाला परवानगी द्यायला हवी? तर कदापि नाही. तुम्ही अल्लाह बॉम्ब किंवा बदमाश जीसस असे शीर्षक ठेऊ शकता? नाही ना, मग लक्ष्मी बॉम्ब टायटल कसे चालणार? असे वाद निर्माण व्हावे, त्यावरून चर्चा व्हावी यासाठीच असा धूर्तपणा केला जातो. हे असेच होते आणि होत राहील. मात्र कधीतरी हे थांबवावे लागेल आणि हे केवळ जनताच थांबवू शकते. या व्यावसायिक लोकांमध्ये जराही हिंदूंची भीती नाही. दुस-या धर्मासोबत असा पंगा घेऊन दाखवा, तलवारी निघतील. म्हणून अन्य धर्माशी हे लोक पंगा घेत नाही. हिंदू धर्म मात्र यांच्यासाठी सॉफ्ट टार्गेट आहे. प्रत्येक निर्माता आपला सिनेमा हिट करू इच्छितो, त्यासाठी जाणीवपूर्वक असे वाद निर्माण केले जातात. लक्ष्मी बॉम्ब हा सिनेमाही त्यापैकीच एक आहे. डिफ्युज करा याला…’, असे मुकेश खन्ना यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले.
News English Summary: Akshay Kumar’s film ‘Lakshmi Bomb’ has been mired in controversies even before its release. Actor Mukesh Khanna’s name has also been added to those who protest. He described the film’s name as ‘mischief-filled’. He said that all of us should raise our voice for this. Mukesh Khanna believes that the film should not be opposed, but he has problems with the name ‘Laxmi Bomb’. On Tuesday, he shared the poster of Akshay Kumar’s film ‘Laxmi Bomb’ from his Instagram account. Mukesh Khanna wrote, “Should a film be released with the title of Laxmi Bomb? It is not permissible to ban the film if you ask me, because I have just seen the trailer, the film is still pending. ” He further says that there is a problem with its name, not from the film. Placing ‘bomb’ in front of ‘Lakshmi ji’ seems mischievous.
News English Title: Actor Mukesh Khanna opposed Akshay Kumar film Laxmi Bomb title entertainment news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Peel Off Mask | नवरात्रीमध्ये चेहरा चमकेल, केवळ 2 पदार्थांपासून घरीच तयार करा पिल ऑफ मास्क - Marathi News
- Bigg Boss Marathi | बीबी हाऊसमध्ये वाजणार DJ क्रेटेक्स, एलिमिनेशनची टांगती तलवार असणार डोक्यावर - Marathi News
- Face Pack | आता घरीच तयार करा टोमॅटोपासून बनलेले हे 3 फेसस्क्रब, चेहरा उजळून निघेल - Marathi News
- Bigg Boss Marathi | बिग बॉसच्या घरात होणार रीयुनियन, पुन्हा एकदा पाहायला मिळणार अरबाज आणि निक्कीची केमिस्ट्री
- Shardiya Navratri 2024 | शारदीय नवरात्रीचा तिसरा दिवस माता चंद्रघंटेला असतो समर्पित, अशी गेली जाते देवी चंद्रघंटेची उपासना
- Personal Loan EMI | पर्सनल लोन घेऊन वेळेआधीच फेडताय मग या 4 गोष्टींची काळजी घ्या, नुकसान टाळता येईल - Marathi News
- Devara Movie on Box Office | देवराने पार केली डबल सेंचुरी, प्रेक्षकांची तुफान गर्दी, हॉलिडेमुळे बंपर कमाई - Marathi News
- Bigg Boss Hindi 18 | बिग बॉस हिंदीच्या ग्रँड प्रीमियरची जोरदार चर्चा, घराचा आगळावेगळा लुक आला समोर - Marathi News
- Credit Card Application | पगारदारांनो, सिबिल स्कोर चांगला नसेल तर क्रेडिट कार्ड विसरा, सोबतच आर्थिक नुकसान देखील होईल
- Loan Alert | नोकरदारांनो, 'या' चुकांमुळे कर्जाचा डोंगर डोक्यावरून कधीही उतरणार नाही, या गोष्टी लक्षात ठेवा - Marathi News