25 September 2020 12:10 AM
अँप डाउनलोड

संपूर्ण मनसे अभिजित पानसें'साठी आक्रमक, राऊतांकडून ट्विट डिलीट

मुंबई : ‘ठाकरे’ सिनेमाच्या स्क्रिनिंग दरम्यान रंगलेल्या मानापमान नाट्यानंतर महाराष्ट्र सैनिकांसोबत मनसे पदाधिकारी सुद्धा संजय राऊतांविरोधात आक्रमक झाली आहे. परंतु हा वाद केवळ समाज माध्यमांवर मर्यादित न राहता, मनसे कार्यकर्त्यांनी ठाण्यात वंदना टॉकीजबाहेर आंदोलन करत ठाकरे सिनेमाच्या पोस्टवरुन संजय राऊत यांचं नाव खोडत स्वतःचा राग व्यक्त केला.

BhagyaVivah Marathi Matrimonial

संजय राऊत ‘ठाकरे’ सिनेमाचे निर्माते आहेत. विशेष म्हणजे राऊतांनी काही वेळापूर्वी केलेले विवादित ट्विट डिलीट मारले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी ‘लहान मेंदूत अहंकाराचा कचरा साचला की संयम आणि कृतज्ञता या शब्दांचे मोल नष्ट होते. ठाकरे चित्रपटाचा हाच संदेश आहे’, असं म्हटलं होतं. या ट्विटच्या माध्यमातून संजय राऊत यांनी दिग्दर्शक अभिजित पानसेंवर निशाणा साधल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी संजय राऊतांना समाज माध्यमांवर चांगलेच धारेवर धरले. परिणामी, एकदा सोडलेला शब्दांचा बाण शिवसैनिक परत घेत नाही, अशा बाता मारणारे खासदार संजय राऊतांनी ट्विट डिलीट केले आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(134)#Shivsena(921)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x