23 September 2019 11:17 AM
अँप डाउनलोड

राष्ट्रवादीतून आलेल्या जयदत्त क्षीरसागरांना मंत्रीपद? जुन्या शिवसेना आमदारांमध्ये प्रचंड नाराजी

Shivsena, Udhav Thackeray

मुंबई : बहुप्रतीक्षित महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तार १४ जून रोजी पार पडण्याची शक्यता आहे, त्या अनुषंगाने शिवसेनेतील आमदारांनी लॉबिंग केले होते मात्र लोकसभा निवडणुकीत बाहेरून आलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना शिवसेनेच्या कोट्यातील आणि मंत्रीपदे भारतीय जनता पक्षाला मिळण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यातील नेते माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची शिवसेनेकडून मंत्रीपदी वर्णी लागणार असल्याचं बोलले जात आहे. परंतु बाहेरून आलेल्या नेत्याला मंत्रीपद दिल जाणार असल्याने शिवसेनेतील आमदारांमध्ये मोठ्याप्रमाणावर धूसफूस सुरु झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

क्षीरसागर यांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता, बीड विधानसभेची जागा युतीमध्ये शिवसेनेकडे असल्याने त्यांनी भाजपमध्ये न जाता सेनेत प्रवेश केला. बीड लोकसभेच्या भाजप उमेदवार खा. प्रतीम मुंडे यांना विजयी करण्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे काम केले आहे. आगामी विधानसभा निवडणूक पाहता मराठवाड्यात पक्षाची ताकद आणखीन वाढवण्यासाठी क्षीरसागर यांना मंत्रीपद मिळू शकते.

दरम्यान, शिवसेनेच्या पडत्या काळामध्ये देखील पक्षाची साथ न सोडणाऱ्या आमदारांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय भूमिका याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अनुरूप वधू - वर सुचक मंडळ

हॅशटॅग्स

#Shivsena(571)#UddhavThackeray(52)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या