20 June 2021 3:31 PM
अँप डाउनलोड

भाजप नगरसेवकाचा पराक्रम, बनावट कागदपत्रांनी नवनगर विकास प्राधिकरणाची जमीन विक्री

BJP Maharashtra

पिंपरी, २८ मे |  पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र त्यामुळे भारतीय जनता पक्ष अडचणीत आला आहे आणि त्याला कारण ठरला आहे पिंपरीतील भाजप नगरसेवक. भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक राजेंद्र लांडगे यांना भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची जागा परस्पर विक्री केल्याचा ठपका लांडगेंवर ठेवण्यात आला आहे. लांडगेंसह एका जमीन खरेदीदारालाही ताब्यात घेण्यात आले आहे, तर एकाचा शोध सुरु आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

पिंपरी चिंचवडमधील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक राजेंद्र लांडगे यांनी नवनगर विकास प्राधिकरणाची जागा परस्पर विक्री केल्याचा आरोप आहे. मूळ मालक नसताना देखील बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर जमीन विक्रीचा ठपका लांडगेंवर गुन्हा नोंदवताना ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे जमीन खरेदी करणाऱ्यांपैकी मनोज शर्माही पोलिसांच्या ताब्यात असून रविकांत ठाकूरचा शोध सुरु आहे. याविषयी दोन्ही खरेदीदारांनाही माहिती असल्याचं समोर आलं आहे.

राजेंद्र लांडगेंनी आतापर्यंत पिंपरी चिंचवड महापालिकेतील शहर सुधारणा समितीचे सभापतीपद, स्थायी समितीचे सदस्यत्व भूषवले आहे. नगरसेवक लांडगे यांनी पॉवर ऑफ अॅटर्नी, ताबा पावती केल्याचे समोर आले आहे. त्यानुसार भोसरी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

 

News English Summary: Bharatiya Janata Party corporator Rajendra Landage has been arrested by Bhosari police. Landge has been blamed for selling the Pimpri Chinchwad Navnagar Development Authority land to each other. A land buyer, including a wolf, has also been arrested, while a search is on for one.

News English Title: BJP corporator Rajendra Landage has been arrested by Bhosari police for selling the Pimpri Chinchwad Navnagar Development Authority land news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(630)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x