29 March 2024 5:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

पुणे महापालिका | कोरोनाने घरी मृत्यू झाल्यास नातेवाईकच अंत्यसंस्कार करतील

Pune, Municipal Corporation, Corona patients

पुणे, ०१ एप्रिल: कोरोना रुग्णांच्या संदर्भात पुणे महानगरपालिकेनं एक नवा नियम आणला आहे. त्यानुसार घरात उपचार घेताना एखाद्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला, तर कुटुंबीयांनाच सर्व नियम पाळून त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागणार आहेत. त्यासाठीची सर्व प्रक्रिया नातेवाईकच पूर्ण करतील. फक्त गाडीची सुविधा पुरवली जाईल. महापालिकेच्या या नव्या नियमाची माहिती एका वृत्तामुळे समोर आली आहे.

पहिल्या लाटेत कोरोनामुळं मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना तर आपल्या जवळच्या व्यक्तीचा चेहरा पाहण्याची संधीही मिळत नव्हती. कोरोनाचे संक्रमण होऊ नये म्हणून रुग्णालयातील कर्मचारीच अंत्यसंस्कारही करत होते. अगदी कुटुंबातील मोजक्या तीन-चार जणांनाच अंत्यसंस्कारासाठी जाता येत होतं. मृतदेहामुळं अंत्यविधीदरम्यान कोणाला संसर्ग होऊ नये हा त्यामागचा हेतू होता. पण कोरोनाची स्थिती जशी-जशी बदलत आहे त्यानुसार नियमांमध्येही वेगवेगळे बदल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान, देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात महाराष्ट्र सर्वात पुढे असून, राज्यात लॉकडाऊन लागणार अशा चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एका वृत्त वाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाउनबाबत मोठे विधान केले आहे.

यावेळी बोलताना राजेश टोपे म्हणाले की, राज्यात सध्या तरी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. पण, त्या दिशेनेच वाटचाल सुरू आहे. पण याचा अर्थ राज्यात लॉकडाऊन लागेलच, असा नाही. पण सरकारला तशी तयारी करुन ठेवणे हे गरजेचे आहे, असे टोपे म्हणाले. यावेळी राजेश टोपे यांनी राज्यातील नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क घालण्याच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन केले.

 

News English Summary: Pune Municipal Corporation has brought a new rule regarding corona patients. According to him, if a corona patient dies while undergoing treatment at home, the family members will have to follow all the rules and cremate his body. Relatives will complete all the procedures for that. Only car facility will be provided. Information about this new rule of NMC has come to light due to a report.

News English Title: Pune Municipal Corporation has brought a new rule regarding corona patients news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)#Pune(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x