11 December 2024 12:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल IPO GMP | आला रे आला IPO आला, गुंतवणुकीची मोठी संधी, पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा - GMP IPO 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, जानेवारी 2025 मध्ये महागाई भत्ता इतका वाढणार, अपडेट आली Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट होणार, तेजीचे संकेत - NSE: NTPCGREEN BEL Share Price | डिफेंस शेअरमध्ये तेजीचे संकेत, मिळेल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: BEL
x

राष्ट्रवादी काँग्रेसने ३ हजार २७६ ग्रामपंचायती जिंकल्या – जयंत पाटील

NCP, minister Jayant Patil, Gram panchayat 2021

मुंबई, १९ जानेवारी: नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात सर्वात जास्त म्हणजे ३ हजार २७६ ग्रामपंचायती जिंकल्या असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली. १३ हजार २९५ ग्रामपंचायतींच्या निवडणूका पार पडल्या. यामध्ये ३ हजार २७६ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी विजयी झाली आहे. तर काँग्रेस १९३८, भारतीय जनता पक्ष २९४२,शिवसेना २४०६ यांनी एवढया ग्रामपंचायती घेतल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

महाआघाडीने अनेक ठिकाणी एकत्रित मिळून निवडणुका लढवल्या. महाविकास आघाडीचं यश मोठं आहे. त्या तुलनेत भारतीय जनता पक्षाला 20 टक्केही नाही, भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व मर्यादित असल्याचं दिसून आलं आहे, असं सांगतानाच चिन्हावर निवडणूक लढवली जात नसताना भारतीय जनता पक्षाकडून दावा केला जाणं योग्य नाही, असा चिमटाही त्यांनी काढला. राज्याचं स्टिअरिंग मुख्यमंत्र्यांच्याच हातात आहे. अनेक अडथळे आहेत. पण त्यांची गाडी व्यवस्थित सुरू आहे, असं त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.

दरम्यान, पत्रकार अर्णव गोस्वामी यांचे चॅट बाहेर आले आहेत. ही गंभीर बाब आहे. त्यांच्याकडे संरक्षण संबंधातील एवढी माहिती बाहेर येणं हे धक्कादायक आहे. भारतीय जनता पक्षाने या प्रकरणी अर्णव यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असं सांगतानाच टीआरपी घोटाळ्याची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. या प्रकरणातील प्रत्येक गोष्टीचा खुलासा झाला पाहिजे. केंद्र सरकारने या घटनेला निरपेक्षपणे पाहिलं पाहिजे, असं देखील ते म्हणाले.

 

News English Summary: In the recent Gram Panchayat elections, NCP has won the highest number of 3,276 Gram Panchayats in the state, said NCP State President and Water Resources Minister Jayant Patil while talking to media. 13 thousand 295 Gram Panchayat elections were held. In this, NCP has won over 3 thousand 276 Gram Panchayats. Jayant Patil said that Congress 1938, Bharatiya Janata Party 2942, Shiv Sena 2406 took so many Gram Panchayats.

News English Title: NCP state president Jayant Patil press conference over gram panchayat 2021 result news updates.

हॅशटॅग्स

#JayantPatil(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x