12 December 2024 8:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Gram Panchayat Result | चौंडी हे राम शिंदेंचं मूळ गाव | 9 पैकी 7 जागांवर रोहित पवारांचा करिष्मा

Gram Panchayat election 2021, NCP MLA Rohit Pawar, BJP leader Ram Shinde

जामखेड, १८ जानेवारी: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. १५ जानेवारी रोजी राज्यातील सुमारे १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीसाठी सरासरी ७९ टक्के मतदान झाले. आज सकाळपासून या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत.

विधानसभा निवडणुकीनंतर ग्रामपंचायत निवडणुकीतही राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी भाजपचे नेते राम शिंदे यांना मोठा धक्का दिला आहे. राम शिंदे यांच्या चौंडी गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत रोहित पवार गटाचा विजय झालाय. चौंडी ग्रामपंचायतीतील 9 पैकी 7 जागांवर रोहित पवार यांच्या गटानं विजय मिळवला आहे. तर राम शिंदे यांच्या गटाला 2 जागा राखण्यात यश मिळालं आहे.

चौंडी हे राम शिंदे यांचे मूळ गाव आहे. अहिल्यादेवी होळकर यांच ते वंशज आहेत. याच गावाच्या जोरावर त्यांना राज्यात मंत्रिपदापर्यंत संधी मिळत गेली. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीपासून चित्र बदलत गेले. मतदारसंघातील पराभवानंतर शिंदे यांची आता गावावरील पकडही सुटल्याचे यातून दिसून येते. आमदार रोहित पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधीपासून सुरू केलेला जनसंपर्क त्यांच्या कामाला येत असल्याचे दिसून येते.

 

News English Summary: After the assembly elections, NCP’s Rohit Pawar has also given a big push to BJP leader Ram Shinde in the Gram Panchayat elections. Rohit Pawar’s group has won the Gram Panchayat election in Ram Shinde’s Choundi village. Rohit Pawar’s group has won 7 out of 9 seats in Choundi Gram Panchayat. Ram Shinde’s group has managed to retain 2 seats.

News English Title: Gram Panchayat election 2021 NCP MLA Rohit Pawar got huge success against BJP leader Ram Shinde news updates.

हॅशटॅग्स

#RohitPawar(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x