17 April 2021 11:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
लस घेतल्यानंतर शरीरात अँटीबॉडीज असल्याने विषाणूचा फार वाईट परिणाम होणार नाही - डॉ. गुलेरिया पियुष गोयल महाराष्ट्रातून राज्यसभेवर | पण संकटात महाराष्ट्रावर निर्लज्ज राजकारणाचा आरोप राज्यावर कोरोना संकट | राष्ट्रवादीच्या आमदाराने उभारलं ११०० बेडचं कोविड सेंटर | १०० बेड्सना ऑक्सिजन सुविधा देशभरात रुग्णांना रेमडेसीवीर नाही, ऑक्सीजन नाही, अंत्यसंस्कारासाठी रांगा तरी मोदी निवडणुकीच्या प्रचारात कोरोनाची तिसरी लाट कधीही उसळेल | उद्धव ठाकरेंचं उद्योगांना नियोजनपूर्वक सज्ज राहण्याचं आवाहन तुम्ही 'प्रधान कोवइडियट' आणि सुपर स्प्रेडर आहात | देशाच्या इतिहासातील सर्वात निर्लज्ज पंतप्रधान - काँग्रेस नेत्याची टीका मुख्यमंत्र्यांनी ऑक्सिजन-रेमडेसिवीर संदर्भात मोदींना कॉल केला | पण ते प्रचारात आहेत असं उत्तर मिळालं
x

Gram Panchayat Result | दक्षिण सोलापुरात भाजपचा सुपडा साफ | काँग्रेसची बाजी

BJP lost, Gram Panchayat Election 2021, South Solapur

सोलापूर, १८ जानेवारी: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. १५ जानेवारी रोजी राज्यातील सुमारे १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीसाठी सरासरी ७९ टक्के मतदान झाले. आज सकाळपासून या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

आदर्शगाव हिवरेबाजारमध्ये विरोधकांचे बंड ठरले फुसका बार, कमी मते मिळाल्याने सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार. तीस वर्षांनंतर निवडणूक होऊनही ग्रामस्थांचा पवार यांच्यावरील विश्वास कायम. आदर्शगाव हिवरेबाजारमध्ये पोपटराव पवार यांची पुन्हा एकहाती सत्ता. सर्व जागा जिंकल्या. पोपटराव पवार यांच्या विरोधी उमेदवाराला ४४ मते. पवार २८२ मते घेऊन विजयी झाले.

दरम्यान, राज्यातील अनेक ठिकाणी भाजप पुरस्कृत गटाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दक्षिण सोलापूरमध्ये काँग्रेसने भाजपला धोबीपछाड देत सर्व 9 जागा जिंकल्या आहे. दक्षिण सोलापुरातील घोडा तांडा ग्रामपंचायतीचा निकाल समोर आला आहे. एकूण 9 जागांसाठी मतदान घेण्यात आले होते. आज सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली. 9 पैकी 9 जागांवर काँग्रेसने बाजी मारली आहे. काँग्रेसचे फुलसिंग लालू चव्हाण यांच्या गटाने दणदणीत विजय मिळवला आहे. तर विद्यमान सरपंच चंद्रकांत चव्हाण यांच्या गटाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

 

News English Summary: The BJP supported group has suffered defeats in many parts of the state. In South Solapur, the Congress has won all the nine seats, beating the BJP. The result of Ghoda Tanda Gram Panchayat in South Solapur has come to light. A total of 9 seats were polled. Counting began at 8 a.m. today. Congress has won 9 out of 9 seats.

News English Title: BJP lost badly Gram Panchayat Election 2021 in south Solapur news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(600)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x