इथे तर पुलवामा आणि बालकोटवर हल्ला कधी होणार हे अर्णव यांना आधीच माहीत
मुंबई, १८ जानेवारी: अर्णव गोस्वामी यांचे चॅट बाहेर आले आहेत. त्यातून त्यांना पुलवामा आणि बालकोटवर हल्ला होणार असल्याचं आधीच माहीत असल्याचं दिसून येतं. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत गंभीर बाब आहे, त्यामुळे त्यांचं कोर्ट मार्शल झालं पाहिजे, अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांनी आता याप्रकरणावर बोललं पाहिजे. याबाबत त्यांची मते काय आहेत, याविषयी आमच्या ज्ञानात भर घातली पाहिजे, असा टोला राऊत यांनी लगावला.
राज्यांतील नेतृत्व हिमतीचे व खमके असेल तर भारतीय जनता पक्षाचे केंद्रातील नेते काहीच करू शकत नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा खमकेपणा सिद्ध केलाच, पण अर्णबसारख्या भुताटकीचे खरे रूपही लोकांसमोर आणले. आता ‘अर्णब’चा आणि आपला काही संबंध नसल्याचे भारतीय जनता पक्षाचे पुढारी सांगत आहेत. हा पळपुटेपणा आहे. मराठीत एक म्हण आहे – ‘केले तुका आणि झाले माका’. गोस्वामीच्या बाबतीत नेमके तेच घडले आहे, असे म्हणत शिवसेनेने भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून भारतीय जनता पक्षावर टीकेचा बाण सोडला आहे.
एखाद्या अधिकाऱ्याकडे नकाशा जरी सापडला तरी त्याचं कोर्ट मार्शल केलं जातं. नंतर त्या अधिकाऱ्याचं काय होतं ते कुणालाच माहीत नसतं. इथे तर पुलवामा आणि बालकोटवर हल्ला कधी होणार हे अर्णव यांना आधीच माहीत असल्याचं दिसतं. म्हणजेच देशाच्या सुरक्षेत कुठेतरी कमतरता आहे हे त्यातून दिसून येतं. त्यामुळे अर्णव यांचं कोर्ट मार्शल होणार का? असा आमचा सवाल आहे, असं राऊत म्हणाले.
News English Summary: Arnav Goswami’s chats have come out. It shows that they already know that Pulwama and Balkot will be attacked. Shiv Sena leader Sanjay Raut demanded that this should be a court martial as it is a very serious matter in terms of national security. Also, Union Home Minister Amit Shah and key BJP leaders in the state should now speak on the issue. “We need to increase our knowledge of what their views are,” he said.
News English Title: Shivsena slams BJP over Arnab Goswami issue over getting military secret news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News