11 April 2021 5:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
आंबे खाल्ल्यावर मुलं होतात असे बोलणाऱ्यांनी संकटाच्या काळात समाजाची दिशाभूल करु नये कोरोना व्हायरसची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षाही अधिक घातक - योगी आदित्यनाथ देशात रेमडेसिविर इंजेक्शनसाठी लोकांची वणवण | पण गुजरातमध्ये भाजप कार्यालयात स्टॉक परमबीर सिंह अडचणीत | राज्य सरकारने माजी पोलिस आयुक्तांचा तपास IPS संजय पांडेंकडे सोपवला उद्या मोदींनी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केल्यास त्यालाही फडणवीस विरोध करणार का? पंढरपूर पोटनिवडणूक | राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मनसेचा पाठिंबा | भाजपविरोधात प्रचारही करणार पुणे | PM केअर फंडातून मिळालेले 58 व्हेंटिलेटर निकृष्ट दर्जाचे, अधिकाऱ्याची तक्रार
x

भाजपची सत्ता असलेल्या नाशिक पालिकेत ऑक्सिजन बेड मिळेना | कोरोना रुग्णांवर ठिय्या आंदोलनाची वेळ

Corona patients, Oxygen cylinders, Nashik municipal corporation

नाशिक, ३१ मार्च: भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या नाशिक महापालिकेत परिस्थिती गंभीर झाली आहे. मात्र महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे कोरोना रुग्णांना जीव देखील गमवावा लागू शकतो असे प्रकार घडत आहेत. तसाच एक भीषण प्रकार नाशिकमध्ये घडल्याचं पाहायला मिळतंय.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दोन कोरोना रुग्णांची नाशिक महापालिकेसमोरच ठिय्या आंदोलन केलं. ऑक्सिजन सिलेंडरसह हे दोन्ही रुग्ण महापालिकेसमोर आंदोलनाला बसले. अनेक रुग्णालयात फिरुन देखील बेड मिळत नसल्यानं या रुग्णांनी ठिय्या आंदोलन केलं. या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतोय. अशा स्थितीत या दोन्ही रुग्णांनी महापालिकेसमोरच ठिय्या दिला. त्यामुळे नाशिक महानगरपालिकेकडून कोरोना रुग्णांसाठी होत असलेल्या तोकड्या उपाययोजना चव्हाट्यावर आल्या आहेत.

नाशिक शहरातील कोरोना बधितांचा आकडा वाढत असताना पुरेशा आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत महापालिकेच्यावतीने खासगी आणि शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन बेड उपलब्ध असल्याचे सांगितले असले तरी प्रत्यक्षात परंतु उपलब्ध होत नाहीत, अशी तक्रार यावेळी त्यांनी केली शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे आणि महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी त्यास दुजोरा दिला. यावेळी महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने मनपाची रुग्णवाहिका पाठवली आणि त्यानंतर या रुग्णास आणखी एका संसर्ग बाजाराला घेऊन नाशिक मनपाच्या बिटको रुग्णालयात दाखल करण्यासाठी रवाना केले.

दुसरीकडे काल संध्याकाळी पवन नगरच्या भाजी बाजारात नियमांचा फज्जा उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. भाजी बाजारात जाण्यासाठई 5 रुपये शुल्क आकरण्यात येत होते. ही पावती घेण्यासाठीही नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. पावती घेण्यासाठी नागरिकांनी भली मोठी रांग लावली होती. त्यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजल्याचं दिसून आलं.

 

News English Summary: Two Corona patients staged a sit-in agitation in front of Nashik Municipal Corporation. Both the patients along with oxygen cylinders sat in agitation in front of the Municipal Corporation. These patients staged sit-in agitation as they could not get beds even after visiting many hospitals.

News English Title: Corona patients protest with carrying oxygen cylinders in front of Nashik municipal corporation news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(599)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x