26 April 2024 9:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक भूमिपूजन सोहळा संपन्न | सरकारमधील प्रमुख नेत्यांची उपस्थिती

Bhumi Pujan, Balasaheb Thackeray's memorial, CM Uddhav Thackeray

मुंबई, ३१ मार्च: बाळासाहेब ठाकरे यांच्या मुंबई येथील स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत, उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर असे मोठे नेते या कर्यक्रमाला उपस्थित होते.

दरम्यान, बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक हा सरकारी कार्यक्रम असल्यामुळे या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देखील निमंत्रित केलं जाईल अशी अपेक्षा होती. मात्र, तसं झालं नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नेतेमंडळींकडून त्यावर तीव्र शब्दांमध्ये टीका केली गेली. नितेश राणे यांनी देखील “आज बाळासाहेब असते तर पहिलं निमंत्रण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना दिलं असतं”, असं म्हणत निशाणा साधला होता.

तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे राज ठाकरे यांना देखील कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं. त्यावरून देखील मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी निशाणा साधत “सरकार पडण्याची भिती होती म्हणून इतक्या घाईत भूमिपूजन सोहळा करून घेतला”, अशी खोचक टीका केली आहे.

 

News English Summary: Bhumi Pujan of Balasaheb Thackeray’s memorial in Mumbai was held. Bhumi Pujan was held by Chief Minister Uddhav Thackeray. The event was attended by veteran leaders. Deputy Chief Minister Ajit Pawar, Revenue Minister Balasaheb Thorat, Thane Guardian Minister Eknath Shinde, MP Sanjay Raut, Industry Minister Subhash Desai, Mumbai Mayor Kishori Pednekar and other senior leaders were present on the occasion.

News English Title: Bhumi Pujan of Balasaheb Thackeray’s memorial in Mumbai was held in presence of CM Uddhav Thackeray news updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x