बाळासाहेब! जे तुम्हाला शक्य झालं नाही ते तुमच्या मुलाला कधीच जमणार नाही - निलेश राणे
मुंबई, १७ नोव्हेंबर: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Hindu Hruday Samrat Balasaheb Thackeray) यांचा आज आठवा स्मृतीदिन. या संपूर्ण महाराष्ट्र आणि देशातील शिवसैनिकांच्या, हिंदूंच्या आणि अनेक राजकीय व्यक्तींच्या मनात आदराचं स्थान असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस सर्व स्तरांतून अभिवादन करण्यात येत आहे. बाळासाहेब आज आपल्यात नसले तरीही त्यांची वादळी राजकीय कारकिर्द आणि राजकारणातील त्यांचं योगदान हे कायमच अग्रस्थानी राहील. अशा या नेत्याच्या काही स्मृतींना शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या ‘सामना’तून उजाळा देण्यात आला आहे.
दरम्यान, याच दिवसाचे औचित्य साधून विरोधक बाळासाहेबांच्या आठवणी काढत उद्धव ठाकरे यांना टोला लगावत आहेत. माजी खासदार नितेश राणे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन केले असून राणे कुटुंबीय आजही बाळासाहेबांना विसरले नाही, असे म्हटलंय. मात्र, त्याचसोबत निलेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं नाव न घेता, त्यांच्यावर टीका केली.
”बाळासाहेब आज तुम्ही नाही आहात पण आजही राणे कुटुंब तुम्हाला विसरले नाही. तुमचा मुलगा आजही आम्हाला संपवायला निघाला आहे पण जे तुम्हाला शक्य झालं नाही ते तुमच्या मुलाला कधीच जमणार नाही… स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.”, असे ट्विट निलेश राणे यांनी केलंय. राणे कुटुंबीय आणि शिवसेनेचा वाद महाराष्ट्राला परिचीत आहे. त्यातून दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राणे कुटुंबीयांवर शाब्दीक बाण चालवले होते. त्यानंतर, राणे पिता-पुत्रांनीही शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली. तसेच, ट्विवरवरुन सातत्याने शिवसेनेवर प्रहार करणाऱ्या निलेश राणे यांनी पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
बाळासाहेब आज तुम्ही नाही आहात पण आजही राणे कुटुंब तुम्हाला विसरले नाही. तुमचा मुलगा आजही आम्हाला संपवायला निघाला आहे पण जे तुम्हाला शक्य झालं नाही ते तुमच्या मुलाला कधीच जमणार नाही… स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 17, 2020
News English Summary: Today is the eighth memorial day of Hindu Hruday Samrat Balasaheb Thackeray. The memory of Balasaheb Thackeray, who has a place of respect in the minds of Shiv Sainiks, Hindus and many politicians in Maharashtra and across the country, is being saluted from all walks of life. Meanwhile, justifying the same day, the opposition is attacking Uddhav Thackeray, remembering Balasaheb. Former MP Nitesh Rane greeted Balasaheb on his Memorial Day and said that the Rane family has not forgotten Balasaheb even today. However, at the same time, Nilesh Rane criticized Chief Minister Uddhav Thackeray without mentioning his name.
News English Title: Former MP Nilesh Rane criticized Chief Minister Uddhav Thackeray news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा