28 April 2024 1:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Credit Card | तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे? मग या 5 चुका टाळा, अन्यथा आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Property Knowledge | फ्लॅट किंवा घर विकत घेण्याचा विचार आहे? या 4 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे-प्रॉपर्टी हातचं जाईल EDLI Calculation | नोकरदार EPFO सदस्यांना मिळतो 7 लाखांपर्यंत मोफत इन्शुरन्स, महत्त्वाचे फायदे लक्षात ठेवा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार? SBI CIBIL Score | पगारदारांनो! 'या' चुकांमुळे तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो, अशा प्रकारे वाढवा क्रेडिट स्कोअर Personal Loan | पर्सनल लोन फेडता येत नसेल तर काळजी करू नका, करा हे काम, टेन्शन संपेल IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या
x

भारतीय क्रिकेट टीमचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे निधन

मुंबई : अजित वाडेकर यांच्या नैतृत्वाखाली भारताने पहिल्यांदाच परदेशात कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम केला होता. काल त्याच महान क्रिकेटपटूचे वयाच्या ७७ व्या वर्षी मुंबई येथे निधन झाले आहे. त्यामुळे संपूर्ण क्रिकेट जगतात शोककळा पसरली आहे. मागील काही काळापासून त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईच्या जसलोक इस्पितळात दाखल करण्यात आले होते.

त्यांचा भारतीय क्रिकेट जगतातील प्रवास हा १९५८ साली सुरु झाला होता आणि त्यावेळी त्यांनी मुंबईच्या संघातर्फे प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. दरम्यान १९६६ ते १९७४ या काळात त्यांनी भारतीय क्रिकेट टीमचे प्रतिनिधीत्व केले होते. टीमच्या सामन्यांमध्ये ते तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरायचे तर स्लीपमधील उत्तम क्षेत्ररक्षक म्हणूनही अशी त्यांची मुख्य ओळख होती.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांना तत्कालीन सर्वोत्तम वेस्ट इंडिजविरुद्ध खेळायची पहिल्यांदा संधी मिळाली होती. त्यांच्या क्रिकेटमधील योगदानाची दखल घेत भारत सरकारने त्यांना १९६७ साली अर्जून तर १९७२ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.

हॅशटॅग्स

#Indian Cricket Team(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x