12 August 2020 12:21 PM
अँप डाउनलोड

अमित शहा रुग्णालयात; छोटी शस्त्रक्रिया होणार; अहमदाबादच्या इस्पितळाला पसंती

Amit Shah, Narendra Modi, Health issue, KD Hospital, Swine Flue

अहमदाबाद : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गुजरातमधील अहमदाबादच्या खासगी रुग्णालयात अमित शाह ऍडमिट झाले आहेत. अमित शाहांवर छोटी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यांच्या एकूण ४ ते ५ प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या झाल्या.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

अमित शाह केंद्रीय गृहमंत्री असले तरी त्यांनी थेट दिल्ली गाठून एम्स’मध्ये दाखल ना होता अहमदाबाद गाठलं आहे. अहमदाबाद येथील ‘के डी रुग्णालयात’ त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. परंतु ही नेमकी कोणती शस्त्रक्रिया आहे याबाबतची प्रसार माध्यमांना अधिक माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. दोन दिवसांपूर्वीच अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. अमित शाह हे एक तारखेला सोलापुरातील भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेला उपस्थित होते. यानंतर ते मुंबईत लालबाग, सिद्धिविनायक गणपतीच्या दर्शनाला आले होते. तिथून ते दिल्लीला रवाना झाले.

अमित शाह बुधवारी म्हणजे आज गुजरातला वैयक्तिक कारणांसाठी जाणार असल्याचं सांगण्यात येत होतं. त्याचं कारण अस्पष्ट होतं. परंतु आज ते गुजरातमध्ये उपचारासाठी आल्याचं स्पष्ट होत आहे. अमित शाहांचा हा गुजरात दौरा या आठवड्यातील दुसरा दौरा आहे. यावेळी ते कुटुंबीयांची भेट घेणार असल्याचं सांगण्यात येत होतं. दरम्यान लोकसभा निवडणुकीपूर्वी देखील त्यांना स्वाईन फ्लू’ची लागण झाल्याने ते इस्पितळात दाखल झाले होते. त्या उपचारांसाठी दिल्लीतील एम्समध्ये दाखल होणारे अमित शहा यांनी यावेळी मात्र एम्स का टाळलं या चर्चेला उधाण आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमित शहा यांना बुधवारी सकाळी ९ वाजता अहमदाबादमधील केडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांच्यावर किरकोळ शस्त्रक्रिया केली. दुपारी साडेबारा वाजता त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. अमित शहांवर ‘लिपोमा’ची ( शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती केडी रुग्णालय व्यवस्थापनाकडून देण्यात आली.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Amit Shah(239)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x