20 August 2022 8:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Career Horoscope | 20 ऑगस्ट, करिअरच्या दृष्टीने 12 राशींच्या लोकांसाठी शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Ank Jyotish | 20 ऑगस्ट, शनिवारसाठी तुमचा लकी नंबर आणि शुभ रंग कोणता असेल, काय सांगतं अंकज्योतिष शास्त्र Horoscope Today | 20 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या MSSC Recruitment 2022 | महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात 7000 जागांसाठी मोठी भरती, ऑनलाईन अर्ज करा Multibagger Stocks | धमाकेदार शेअर, दीड वर्षात गुंतवणूक 41 पटीने वाढली, हा स्टॉक भविष्यातही मोठा परतावा देऊ शकतो Investment Tips | दररोज फक्त 20 रुपये गुंतवणूक करा, छोट्या गुंतवणुकीतूनही 10 कोटी रुपये परतावा मिळू शकतो, संपूर्ण गणित जाणून घ्या Mutual Funds | म्युचुअल फंड योजनेत दरमहा फक्त 1000 रुपये जमा करा, 2 कोटींहून अधिक परतावा घेऊ अर्थसंपन्न व्हा
x

VIDEO: आरे'तील वृक्षतोडीविरोधात अमित ठाकरेंचं मुंबईकरांना आवाहन; पुढे या व्यक्त व्हा!

Save Aarey, Save Trees, Amit Thackeray, Amit Raj Thackeray, Mumbaikar, Lungs of Mumbai City, Metro Car Shade

मुंबई : मेट्रो कारशेडसाठी आरे जंगलातील झाडे तोडण्यासाठी मुंबई वृक्ष प्राधिकरणाने मंजूरी दिली आहे. मात्र प्रशासनाच्या या निर्णयाला अनेक पर्यावरण प्रेमींनी विरोध केला आहे. आरेमधील वृक्षतोडीविरोधात मनसेने अनेकदा आंदोलनं केली आहेत. यातच पुन्हा एकदा वृक्ष प्राधिकरणाने आरेतील झाडे तोडण्याची परवानगी दिल्याने त्यावर नाराजी व्यक्त करत मनसेने मुंबईकरांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी स्थानिक ८२ हजार लोकांनी तक्रारी दिलेल्या असताना मुंबई वृक्ष प्राधिकरणाने आरेतील वृक्षतोडीसाठी दिलेली परवानगी यामध्ये काही शंका उपस्थित होते असा आरोप केला आहे. अमित ठाकरेंनी SaveAarey या कॅप्शनद्वारे सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात आमचा विकासाला विरोध नाही मात्र पर्यावरणाचा बळी देऊन होणारा विकास आम्हाला नको अशी भूमिका मांडली आहे.

दरम्यान, मेट्रो हटाव, आरे बचाव, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, लढेंगे-जितेंगे अशा घोषणांनी शनिवारी आरे कॉलनीचा परिसर दणाणून गेला होता. मेट्रो ३ प्रकल्पातील आरे कारशेडचा वाद चिघळला असून, २२३८ झाडांच्या कत्तलीविरोधात पर्यावरणप्रेमी आणि आदिवासी यांनी जनआंदोलन छेडले आहे. या जनआंदोलनाला शनिवारी आरे कॉलनी येथून सुरुवात झाली होती. कारशेडच्या जागेबाहेर मोठय़ा संख्येने आदिवासी-पर्यावरणप्रेमी जमले आणि त्यांनी एमएमआरसी, मुंबई महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी स्वतः राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे देखील अत्यंत साधे पणाने आंदोलकांना भेटून आणि गंभीर विषयावर पाठिंबा दर्शवून आल्या होत्या. यावेळी त्यांनी मुंबईतील आरे कॉलनीतील झाडांचं आणि जंगलाचं महत्व देखील उपस्थितांना पटवून दिलं. त्यावेळी निर्दर्शन करणाऱ्या लोकांना देखील शर्मिला ठाकरे यांचा साधेपणा भावल्याचे पाहायला मिळाले. २०१५ मध्ये देखील मनसेतर्फे येथे मोठा मोर्चा काढून प्रशासनाला मुंबईचं फुफ्फुस असलेल्या आरे कॉलनीचं आणि त्यातील हजारो वृक्षांचं महत्व पटवून दिलं होतं.

राज ठाकरे यांनी २०१४ मध्ये सादर केलेल्या ब्लू-प्रिंट मध्ये न्यूयॉर्क मधल्या मॅनहॅटन शहराच्या अगदी मध्यभागी असलेल्या सेंट्रल पार्कची केसस्टडी जनतेसमोर मांडली होती. एकूण ७७८ एकर इतकं मोठ क्षेत्रफळ त्या मॅनहॅटनमधील सेंट्रल पार्कच आहे. तर दुसरीकडे मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान १०४ चौरस किलो मीटर म्हणजे न्यूयॉर्क मधल्या सेंट्रल पार्क सारखी तब्बल ३० पार्क बसतील इतका मोठा नैसर्गिक वारसा मुंबईला लाभला आहे हे तेंव्हा कळलं. विशेष म्हणजे मॅनहॅटनमधील सेंट्रल पार्क हे तिथल्या लोकांना निसर्गात मोकळा श्वास घेता यावा म्हणून एकत्र येऊन उभाराव लागलं होत, परंतु मुंबईकरांना ते निसर्गानेच दान दिलं आहे याची साधी कल्पना सुद्धा मुंबईकरांना नाही, हेच दुःख अनेक पर्यावरण प्रेमी व्यक्त करतात.

हॅशटॅग्स

#AmitThackeray(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x