22 September 2019 2:05 PM
अँप डाउनलोड

US Open: फेडररला पराभवाचा धक्का; तर नदालची स्पर्धा चौथ्यांदा जिंकण्याच्या दिशेने कूच

US Open Tennis 2019, French Open Tennis, Wimbledon Tennis, roger federer, grigor dimitrov

न्यूयॉर्क : टेनिसमधील ‘बापमाणूस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रॉजर फेडररचं अमेरिकन ओपनमधील आव्हान आज उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आलं. बेबी फेडरर, अर्थात ग्रिगोर दिमित्रोव्हनं पाच सेटच्या थरारक सामन्यात फेडररचा पराभव केला. फोरहँडसह अन्य काही फटके फेडररच्याच स्टाईलने खेळत असल्यानं दिमित्रोव्हला बेबी फेडररही म्हटलं जातं. या ‘बेबी’नं आज ‘बाबा’ला पार दमवल्याचं पाहायला मिळालं.

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर याला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसला आहे. बिगरमानांकित ग्रिगोर दिमित्रोव्ह याने तृतीय मानांकित फेडररला ६-३, ४-६, ६-३, ४-६, २-६ असे पराभूत केले. तर दुसरीकडे स्पेनच्या रफाएल नदालने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा चौथ्यांदा जिंकण्याच्या दिशेने कूच केली आहे. त्याने २०१४चा विजेता मरिन चिलिचला पराभूत करून पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. दुसरीकडे, सहाव्या मानांकित अलेक्झांडर झ्वेरेवला चौथ्या फेरीतून गाशा गुंडाळावा लागला.

अनुरूप मराठी वधू - वर मोफत ऑनलाईन नोंदणी

हॅशटॅग्स

#Sports(5)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या