18 April 2024 6:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

Ind vs Aus | पहिल्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियावर 11 धावांनी विजय

India Vs Australia, T20 first cricket match, Indian Won

सिडनी, ४ डिसेंबर: टीम इंडियाने (Indian Cricket Team Tour of Australia 2020-21) पहिल्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियावर 11 धावांनी विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 162 धावांचे आव्हान दिले होते. मात्र ऑस्ट्रेलियाला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 150 धावाच करता आल्या. रवींद्र जडेजा (India Cricketer Ravindra Jadeja), थंगारासू नटराजन (India Cricketer Thangarasu Natrajan) आणि युजवेंद्र चहल (India Cricketer Yuzvendra Chahal) ही तिकडी टीम इंडियाच्या विजयाची शिल्पकार ठरली.

पहिल्या डावातील शेवटची ओव्हर मिचेल स्टार्क टाकत होता. स्टार्कने टाकलेला चेंडू जडेजाच्या हेल्मेटवर येऊन आदळला. सुदैवाने यात जडेजाला गंभीर दुखापत झाली नाही. मात्र त्याला मैदानाबाहेर जावे लागले. तसेच जडेजाला सामन्याच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी करण्यासाठी येता आले नाही. त्यामुळे जडेजाऐवजी युजवेंद्र चहलला बदली खेळाडू म्हणून संधी देण्यात आली.

परंतू ऑस्ट्रेलियाचा मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगरने याला आक्षेप घेतला. सामन्यादरम्यान लँगर डेव्हिड बून यांच्याशी वाद घालत असताना मैदानात दिसला. त्यामुळे जाडेजाच्या ऐवजी बदली खेळाडू म्हणून संघात आलेल्या चहलला गोलंदाजीची संधी कशी मिळाली यावरुन सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये गोंधळ पहायला मिळाला.

 

News English Summary: Team India (Indian Cricket Team Tour of Australia 2020-21) beat Australia by 11 runs in the first T20 match. With this victory, Team India took a 1-0 lead in the three-match series. Team India had challenged Australia for a 162-run victory. However, Australia lost 7 wickets in 20 overs and managed to score only 150 runs. The trio of Ravindra Jadeja, Thangarasu Natrajan and Yuzvendra Chahal were the architects of India’s victory.

News English Title: India Vs Australia T20 first cricket match by Indian cricket team sport news updates.

हॅशटॅग्स

#Indian Cricket Team(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x