बगदाद: इराकची राजधानी बगदादमध्ये अमेरिकेने ड्रोनद्वारे केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात इराणी लष्करातील परदेशात काम करणाऱ्या अल्-कुद्स दलाचा शक्तिशाली कमांडर जनरल कासीम सुलेमानी मारला गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शनिवारी रात्री उशिरा इराणने प्रतिहल्ला चढवत बगदादमधील अमेरिकी दुतावास व अमेरिकेच्या अन्य ठिकाणांवर क्षेपणास्त्र तसेच मोर्टार डागल्याने युद्धाचे ढग दाटू लागले असून इराणमधील ५२ प्रमुख ठिकाणांवर हल्ला करण्याची थेट धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.

अमेरिकी ठिकाण्यांवरील रॉकेट हल्ल्यांनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ”अमेरिकी नागरिक आणि अमेरिकेच्या स्थळांवर हल्ला करणाऱ्यांना वेचून वेचून ठार केले जाईल. जर इराणने आमच्या ठिकाणांवर हल्ला केला तर आम्ही त्यांच्या ५२ ठिकाणांवर संहारक हल्ला करून ती नष्ट करू. ही ५२ ठिकाणे इराण आणि त्याच्या संस्कृतीसाठी फार महत्त्वाची आहेत,”असा सज्जड इशाराच ट्रम्प यांनी दिला आहे.

दुसरीकडे, शनिवारी सकाळी ईराणने जामकरन मशिदीवर लाल झेंडा फडकावून युद्धाचे संकेत दिल्याचं म्हटलं जात आहे. जामकरन मशिदीवरील धार्मिक झेंडा काढून लाल झेंडा फडकवण्याचा अर्थ युद्धाच्या घोषणेच्या रूपात घेतला जात आहे. कारण, इराणमधील कुठल्याही मशिदीवर लाल झेंडा फडकवण्यात आल्याची घटना पहिल्यांदाच घडल्याचं सांगितलं जात आहे.

 

Web Title:  If Iran will strikes American peoples and Assets then USA will hit 52 Iranian sites says US President Donald Trump.

इराणची ५२ ठिकाणे आमच्या निशाण्यावर, डोनाल्ड ट्रम्प यांचा धमकी