12 December 2024 3:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स
x

भयंकर! अमेरिकेत मागील २४ तासांत ६८ हजार ४२८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

America, Covid 19, Corona Virus

न्यूयॉर्क, १७ जुलै : कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेत आतार्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ नोंदविण्यात आली आहे. अमेरिकेत मागील २४ तासांत तब्बल ६८ हजार ४२८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे अमेरिकेतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ३५ लाख ६० हजार ३६४वर पोहोचली आहे. तर २४ तासांत ९७४ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावल्याने अमेरिकेतील कोरोनाबळींची संख्या १ लाख ३८ हजार २०१ इतकी झाली आहे.

जगभरात कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव अमेरिकेत पाहायला मिळत आहे. अमेरिकेतील काही राज्यांनी लॉकडाऊन उठवण्यास सुरुवात केली असून त्याचाही परिणाम म्हणून रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

अमेरिकेत फ्लोरिडा हे करोनाचं केंद्र म्हणून समोर आलं आहे. फ्लोरिडामध्ये गुरुवारी १५६ रुग्णांचा मृत्यू झाला असून १४ हजार नवे रुग्ण सापडले आहेत. फ्लोरिडामध्ये एकूण करोनाबाधित रुग्णसंख्या ३ लाख १५ हजारांच्या पुढे गेली असून ४७८२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्याच्या घडीला इतर राज्यांच्या तुलनेत फ्लोरिडामध्ये दिवसाला सर्वाधिक रुग्णवाढ नोंदवली जात आहे. यानंतर कॅलिफोर्निया आणि टेक्सास यांचा क्रमांक असून दिवसाला १० हजार रुग्णांची नोंद होत आहे.

 

News English Summary: The United States, which has been hit the hardest by the corona, has recorded the highest incidence of atrial fibrillation. In the last 24 hours, 68,428 new corona patients have been registered in the United States.

News English Title: In the last 24 hours, 68428 new corona patients have been registered in the United States News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x