13 December 2024 12:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

अमेरिका भारताला व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करणार – डोनाल्ड ट्रम्प

America, ventilators Supply, US President Donald Trump

वॉशिंग्टन, १६ मे : चीनच्या वुहानमधून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसचं थैमान अद्यापही सुरूच आहे. त्यावर अद्याप ठोस असं वॅक्सीन मिळालेलं नाही. अनेक देशांकडून त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भारतातही कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या या महासंकटाविरुद्ध लढण्यासाठी आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मैत्रीपूर्वक मदतीचा हात पुढे केला आहे. भारत आणि अमेरिका मिळून या अदृश्य शत्रूचा सामना करून असंही ट्रम्प म्हणाले आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला व्हेंटिलेटर्स दान करण्याची मोठी घोषणा शुक्रवारी रात्री उशिरा केली. त्यांनी ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. “मला सांगायला अभिमान वाटतो की अमेरिका आमच्या मित्र देश भारताला व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करणार आहे. या महामारीच्या काळात आम्ही भारत आणि नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे आहोत. आम्ही करोनाविरोधात लस विकसित करण्यासाठी सहकार्य करत आहोत. त्यामुळे आम्ही एकत्र येवून या अदृश्य शत्रूचा पराभव करु” असे डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

माध्यमांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, ‘वर्षाच्या अखेरीस कोविड -19 वर लस उपलब्ध होईल अशी आशा आहे.’ त्यासाठी काही अधिकारी नेमण्याची त्यांनी घोषणा केली आहे.

 

News English Summary: US President Donald Trump made a big announcement late Friday night to donate ventilators to India. He has informed about this by tweeting. “I am proud to say that the United States will supply ventilators to our ally India.

News English Title: America will supply ventilators to India says US President Donald Trump News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x