14 October 2019 2:13 PM
अँप डाउनलोड

अमेरिकेच्या टेक्सासमध्ये झालेल्या गोळीबारात २० जणांचा मृत्यू

America, USA, Donald Trump, Wallmart Firing

वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेच्या टेक्सास शहरात शनिवारी एका अज्ञात हल्लेखोराने बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात २० लोकांचा मृत्यू झाला. टेक्सासच्या एल पासो परिसरात वॉलमार्टमध्ये ही घटना घडली. या गोळीबारात २४ पेक्षा अधिक जण जखमीदेखील आहेत. हा हल्ला २१ वर्षीय तरुणाने केला असून सीएनएनच्या वृत्तानुसार संशयित व्यक्तीचा फोटो मिळाला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याबाबत ट्विट करुन लिहिलं आहे की, एल पासो येथे झालेली गोळीबाराची घटना फक्त दुख:दायक नाही तर क्रुर आहे. अशी शत्रुत्वाची भावना ठेवणाऱ्या घटनांचा मी निषेध करतो. निर्दोष लोकांचे जीव घेणाऱ्यांबद्दल कोणतीही सहानभुती दाखविणं चुकीचं ठरेल.

वॉलमार्टमध्ये शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहक व्यग्र असतानाच हल्लेखोराने प्रवेश करून गोळीबार करण्यास सुरूवत केली. अवघ्या एक आठवड्याभरापूर्वीच उत्तर कॅलिफोर्नियामध्ये फुड फेस्टीव्हलमध्ये एका अल्पवयीन मुलाने गोळीबार करून तिघांचा जीव घेतला होता. वॉलमार्टमध्ये झालेल्या या हल्ल्यात तीन मेक्सिकन नागरिकांचा मत्यू झाला असून, यामध्ये ६ मेक्सिकन नागरिक जखमी झाल्याची माहिती मेक्सिकोचे पंतप्रकधान मॅनयूअल लोपेज ओब्राडोअर यांनी दिली.

हॅशटॅग्स

#Donald Trump(38)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या