18 August 2019 12:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
अर्थमंत्र्यांची पत्नी विश्वस्त पदी; तिरुपती देवस्थानला २०० कोटींचा भूखंड १ रुपया दराने; सरकारचा पराक्रम काश्मीरबाबत पाकमध्ये उच्चस्तरीय बैठक सुरु; सैन्य दलाचे अधिकारीही उपस्थित मी तिथे होती, दिल्ली विद्यापीठात घोषणाबाजीवेळी कन्हैय्या कुमार तेथे नव्हता: भाजप खासदाराची पत्नी सत्तेत आपल्या विचाराचे लोक आहेत; आम्ही सरकारी धोरणात हस्तक्षेप करतो, पण...... बहुमताच्या जोरावर शेतकरी हिताचा स्वामिनाथन आयोग लागू का केला नाही: बच्चू कडू ‘वंचित’कडून २८८ जागा लढण्यासाठी मोर्चेबांधणी; भाजप-सेना देखील स्वबळावर? सविस्तर कारण उद्धव ठाकरे म्हणाले, ‘राणे परत आले तर मी घर सोडीन’
x

काश्मीरमध्ये भारतीय जवानांच्या कारवाईत ७ दहशतवाद्यांचा खात्मा

काश्मीरमध्ये भारतीय जवानांच्या कारवाईत ७ दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये शनिवारी (3 ऑगस्ट) चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. तर एक जवान जखमी झाला आहे. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे.

सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सोपोरमध्ये चकमक सुरू झाली. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. कुपवाडा जिल्ह्य़ाच्या केरन सेक्टरमधील एका सीमा चौकीवर हल्ल्याचा ‘बॅट’ने केलेला प्रयत्न आमच्या दक्ष जवानांनी हाणून पाडला. यात पाकिस्तानचे सुरक्षा कर्मचारी आणि दहशतवादी मिळून ५ ते ७ जण ठार झाले, असे संरक्षण खात्याचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले. ३१ जुलै व १ ऑगस्ट दरम्यानच्या रात्री ‘बॅट’ने हा हल्ल्याचा प्रयत्न केल्याचे सूत्रांनी सांगितले.

काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेच्या मार्गादरम्यान पाकिस्तानी लष्कराची स्नायपर सापडले होते. त्यानंर भारतीय लष्कराने सीमेवर सर्च ऑपरेशन राबवले. या ऑपरेशनदरम्यान भारतीय जवानांनी सीमेवर ७ दहशतवाद्यांना ठार केले आहे. तसेच या ऑपरेशनमध्ये आणखी दहशतवादी ठार झाले असल्याची शक्यता आहे.

दरम्यान, यापूर्वीही दहशतवाद्यांनी भारतीय सीमाभागात घुसण्याचा प्रयत्न केला होता. परंतु भारतीय सैन्याच्या समोर त्यांचा डाव फसला होता. आणि आताही दहशतवादी अशाच प्रयत्नात होते पुन्हा एकदा भारतीय सैन्याने त्यांचा कट उध्वस्त केला आहे.

अनुरूप वधू - वर सुचक मंडळ

हॅशटॅग्स

#Indian Army(34)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या