सेनेत गृहकलह वाढवण्यासाठी फडणवीसांनी आदित्य यांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत भाष्य केलं? सविस्तर
मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहचत आहेत. मात्र ही यात्रा सुरु झाल्याप्पासून आदित्य ठाकरे हेच शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील अशी चर्चा आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष आता विधानसभा निवडणुकीवर लागले आहे. त्यातच मुख्यमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये चढाओढ पहायला मिळत आहे. शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे केलेले पहायला मिळत आहे.
आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यास कोणतीही अडचण नाही. आम्ही आताही त्यांना हे पद देऊ शकतो. आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवणारे ठाकरे परिवारातील पहिले सदस्य ठरतील. तसेच त्यांना सरकारमध्ये पहायलाही आवडेल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं.
टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं. कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणुकांमध्ये सेना भाजपा एकत्र लढणार आहेत. भाजपा जरी मोठा पक्ष ठरला असला तरी आमच्या जुन्या मित्रपक्षांना बाजूला काढण्याची आमची संस्कृती नाही. राज्यात शिवेसना भाजपा समान जागांवर निवडणूक लढतील असं ही ते म्हणाले.
दरम्यान लोकसभा निवडणूक लागण्यापूर्वीच आणि प्रशांत किशोर यांच्या मातोश्री भेटीनंतर लगेचच आदित्य ठाकरे यांच्या नावाने ‘टॅग लाईन’ असलेले अनेक राजकीय कॅम्पेन सुरु झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच शिवसेनेतील प्रत्यक्ष जमिनीवर लढून आणि लोकांमधून निवडून येणाऱ्या आमदार आणि खासदारांना अंधारात ठवून, पक्षात शॉर्टकटने राज्यसभेवर खासदार बनून जाणाऱ्या नेत्यांच्या तोंडून ‘आदित्य महाराष्ट्र तुझी वाट पाहत आहे’ असे राजकीय कॅम्पेन सुरु झाले आहेत आणि त्यात विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने आदित्य ठाकरे यांच्या पक्षातील हालचाली जोरदार सुरु असून, पक्षातील अनेक वर्ष त्याच पदाची अपेक्षा बाळगणारे नेते आता वेटिंगवर गेले आहेत आणि याची दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली आहे.
त्याचाच एक भाग म्हणजे काल आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वतः मंत्री एकनाथ शिंदे तब्बल २५ आमदारांच्या ताफ्याने आले आणि आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या होत्या, मात्र त्यात एक अप्रत्यक्ष संदेश देखील होता, जो भविष्यात उफाळून येऊ शकतो. मात्र पक्षात सुरुवातीपासून मैदानावर काहीच मेहनत केलेली नसताना, केवळ पुत्र प्रेमापोटी भारतीय विद्यार्थी सेना बरखास्त करून ‘युवासेना’ स्थापन करून त्याचे अध्यक्षपद आदित्य ठाकरे यांना देण्यात आले. त्यानंतर शिवसेनेत २०-२५ वर्ष पक्षासाठी झगडणाऱ्या पदाधिकाऱ्यांना देखील नेते पद मिळालेले नसताना, आज आदित्य ठाकरे यांना थेट नेतेपद बहाल करून शिवसनेतील वरिष्ठ नेत्यांच्या रांगेत विराजमान करण्यात आले आहे आणि सध्या थेट मुख्यमंत्री पदासाठी ‘आदित्य महाराष्ट्र तुझी वाट पाहत आहे’ असे राजकीय कॅम्पेन सुरु झाले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या विद्यमान नेतृत्वाने जी राजकीय चाल कधीकाळी राज ठाकरे आणि नारायण राणे यांच्याविरुद्ध वापरली होती, ती आज शिवसेनेतील सर्वच वरिष्ठ नेत्यांविरुद्ध कधी अमलात आणली गेली याचा सुगावा त्यांना देखील लागलेला नाही, असंच म्हणावं लागेल.
भाजप-शिवसेना युती होणारच!
आगामी विधानसभा निवडणुकीत काहीही झाले तरी भाजप-शिवसेना युती होणारच हे स्पष्ट आहे. आम्ही मोठा पक्ष असलो तरी मित्रपक्षाला बाजूला सारायचे ही आमची नीती नाही. आम्ही समान जागांवर लढणार आहोत. या जागा १३० ते १४० इतक्या असतील. उर्वरित जागा आम्हाला मित्रपक्षांनाही द्यायच्या आहेत. या पुढील निवणूक आम्ही केवळ विकास याच मुद्द्यावर लढवणार असल्याचे फडणवीस म्हणाले. आम्ही राज्यातल्या जनतेला चांगले सरकार दिले असून आमच्यावर विश्वास ठेवावा असे जनतेला वाटत असल्याचेही फडणवीस म्हणाले.
‘आता लावलाय हाऊसफुल्लचा बोर्ड’
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, ‘भाजपमधील इतर पक्षांमधील नेत्यांच्या प्रवेशाला महा भरती असे म्हणणे योग्य नाही. आणि आता तर आम्ही आमच्या दरवाज्यांपुढे हाऊसफुल्लचा बोर्ड लावला आहे. मात्र असे असले तरी देखील काही व्हीआयपी नेत्यांना आम्ही पक्षप्रवेश देणार आहोत. मात्र हे नेते स्वच्छ चारित्र्यांचे असायला हवेत. तसेच त्यांनी जनतेची कामे केलेली असली पाहिजेत. येत्या काही दिवसांमध्ये आणखी काही मोठ्या नेत्यांचा प्रवेश भाजपमध्ये होणार आहे’.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News