8 August 2022 9:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
प्रचंड महागाई, बेरोजगारीवर जनता मोदींवर खूप | भाजप नेते दरेकरांच्या उन्मत्त प्रतिक्रियेवर महिलांकडून शिव्या श्राप, व्हिडिओ पहा Guru Vakri 2022 | मीन राशीत गुरू ग्रहाची 118 दिवस उलटी हालचाल, 12 राशींच्या लोकांच्या जीवनात होणार मोठा बदल IRCTC Train Ticket Rules | ट्रेनचं तिकीट नसले तरी टीटीई ट्रेनमधून उतरवू शकत नाही, जाणून घ्या हा नियम Syrma SGS Tech IPO | सिरमा एसजीएस टेक कंपनी 840 कोटींचा आयपीओ लाँच करणार, कंपनीचा तपशील जाणून घ्या PPF Vs ELSS | या दोन जबरदस्त योजनांपैकी परतावा आणि टॅक्स सूट मिळवण्यासाठी कोणती योजना सर्वोत्तम, अधिक जाणून घ्या Horoscope Today | 09 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mutual Fund SIP | म्युच्युअल फंडातून 50 लाखांचा परतवा मिळवण्यासाठी दरमहा किती SIP करावी लागेल जाणून घ्या, नफ्यात राहा
x

दरेकरांनी 24 तासात माफी मागितली नाही तर त्यांच्या तोंडाला काळे वंगण फासणार | सक्षणा सलगर यांचा इशारा

NCP Leader Sakshna Salgar

उस्मानाबाद, १४ सप्टेंबर | भाजप नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या आक्षेपार्ह टीकेनंतर राष्ट्रवादीचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रवीण दरेकरांनी माफी मागावी अशी मागणी केलीय. दरेकर माफी मागा, नाहीतर महिलांचा अपमान करणाऱ्यांचं आम्ही थोबाड आणि गाल रंगवू, असा इशारा चाकणकरांनी दिलाय. त्यानंतर आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून पुण्यात आणि उस्मानाबादेत आंदोलन करण्यात आलं.

दरेकरांनी 24 तासात माफी मागितली नाही तर त्यांच्या तोंडाला काळे वंगण फासणार, सक्षणा सलगर यांचा इशारा – NCP Leader Sakshna Salgar warn BJP leader Pravin Darekar over statement against Lok Kalakar :

दुसरीकडे उस्मानाबादेत राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा सक्षणा सलगर यांनीही प्रवीण दरेकरांना इशारा दिलाय. दरेकर यांनी 24 तासात माफी मागितली नाही तर त्यांच्या तोंडाला काळे वंगण फासणार असल्याचा इशारा सलगर यांनी दिलाय. दरेकर यांनी 24 तासात माफी मागा नाही तर परिणामाला सामोरे जा, असं आव्हानही सलगर यांनी दिलंय.

प्रवीण दरेकर यांच्या वक्तव्याचा सलगर यांनी निषेध केला. भाजप हा महिलांच्या बाबतीत हीन मनोवृत्ती दर्शवणारा पक्ष, दरेकर यांचे वक्तव्य महिलांचा अपमान करणारे आहे फडणवीस साहेब तुमच्या वाचाळ वीरांना आवरा, राम कदम, परिचारक व आता दरेकर यांना आवरा असा टोला सलगर यांनी लगावला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: NCP Leader Sakshna Salgar warn BJP leader Pravin Darekar over statement against Lok Kalakar.

हॅशटॅग्स

#SakshnaSalgar(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x