25 March 2025 5:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 26 मार्च 2025; तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल, बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 26 मार्च रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI FD Interest Rates | एसबीआय बँकेच्या ग्राहकांसाठी अपडेट, सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या FD मध्ये पैसे गुंतवा, मोठा परतावा मिळवा TATA Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: TATAMOTORS Rattan Power Share Price | 9 रुपयांचा पेनी स्टॉक, यापूर्वी 586 टक्के परतावा दिला, पॉवर कंपनी फोकसमध्ये - NSE: RTNPOWER IREDA Share Price | 172 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार, इरेडा शेअर टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA Wipro Share Price | विप्रो शेअर मालामाल करणार, CLSA ब्रोकिंग फर्म बुलिश, टार्गेट प्राईस जाणून घ्या – NSE: WIPRO
x

कर्नाटक सरकार | ऑपरेशन लोटस’ची चौकशी करण्यास न्यायालयाची परवानगी

Operation Kamala Karnataka High court vacates stay allows probe against chief minister Yediyurappa news updates

बंगळुरू, ०१ एप्रिल: देशाच्या राजकारणात बहुचर्चित ठरलेल्या कर्नाटकातील ऑपरेशन लोटसप्रकरणी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना बेंगळुरू उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. याप्रकरणाची चौकशी करण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे येडियुरप्पा यांच्यासमोरील अडचणीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जनता दल सेक्युलरचे नेते नगन गौडा यांचे चिरंजीव शरण गौडा यांनी याप्रकरणी एफआयआर दाखल केला होता. हा एफआयआर रद्द करण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. कोर्टाने हा एफआयआर रद्द करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे.

2019मध्ये आमचं सरकार पाडण्यासाठी भाजपने षडयंत्र रचलं होतं, असा दावा काँग्रेस आणि जेडीएसने केला होता. त्याप्रकरणाची न्यायिक चौकशी करण्याची मागणी देखील या दोन्ही पक्षांनी केली होती. 2018मध्ये त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर काँग्रेस-जेडीएसने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर 2019मध्ये सत्ताधारी आघाडीतील काही आमदार फुटले आणि भारतीय जनता पक्षाला जाऊन मिळाले होते. त्यामुळे राज्यात येडियुरप्पा यांचं सरकार स्थापन झालं होतं. त्यावेळी ऑपरेशन लोटसद्वारेच आमचं सरकार पाडल्याचा आरोप यावेळी काँग्रेसने केला होता. मात्र मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते.

कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी 2018मध्ये निवडणुका झाल्या. या निवडणुकीत भाजप 104, काँग्रेस 80 आणि जेडीएसला 37 जागा मिळाल्या होत्या. त्यात भाजप पहिल्या क्रमांचा पक्ष ठरला होता, मात्र काँग्रेस आणि जेडीएस एकत्र येऊन त्यांनी सत्ता स्थापन केली. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या जेडीएसचे कुमारस्वामी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते. कर्नाटकात बहुमतासाठी 113 जागांची गरज आहे.

 

News English Summary: The Bengaluru High Court has dealt a major blow to Chief Minister BS Yeddyurappa in the wake of Operation Lotus in Karnataka, which has become a hot topic in the country’s politics. The High Court has allowed the matter to be investigated. Therefore, the difficulty facing Yeddyurappa is expected to increase tremendously.

News English Title: Operation Lotus Karnataka High court vacates stay allows probe against chief minister Yediyurappa news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Karnataka(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या