20 June 2021 10:12 PM
अँप डाउनलोड

सरत्या दशकात आणि बदलत्या पिढीत त्यांची गरज जास्तच भासू लागली: राज ठाकरे

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वर्गीय. अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रति त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. स्वातंत्र्यपूर्व असो वा स्वातंत्र्योत्तर भारत ते नवीन सहस्रकातील भारत अशा दीर्घ पटलावर, अर्धशतकाहून अधिक कालावधीची, अटलजींची राजकीय कारकीर्द होती. पण एवढ्या दीर्घ कालावधीत अटलजी कधीच संदर्भहीन झाले नाहीत उलट, प्रत्येक सरत्या दशकात आणि बदलत्या पिढीत त्यांची गरज जास्तच भासू लागली, अशी राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

काय म्हटलं आहे राज ठाकरे यांनी;

स्वातंत्र्यपूर्व असो वा स्वातंत्र्योत्तर भारत ते नवीन सहस्रकातील भारत अशा दीर्घ पटलावर, अर्धशतकाहून अधिक कालावधीची, अटलजींची राजकीय कारकीर्द होती.

पण एवढ्या दीर्घ कालावधीत अटलजी कधीच संदर्भहीन झाले नाहीत उलट, प्रत्येक सरत्या दशकात आणि बदलत्या पिढीत त्यांची गरज जास्तच भासू लागली. आणि म्हणूनच नव्या सहस्रकात प्रवेश करताना देशाचं नेतृत्व अटलजींच्या हाती आलं ह्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही.

काँग्रेस पक्ष जवळपास अजिंक्य वाटत असताना, आणि राजकीय कारकिर्दीचा दीर्घ कालावधी विरोधी पक्षात बसून राजकारण करावं लागत असलं तरी कटुता, हेवेदावे, त्यांच्या व्यक्तिमत्वात आली नाही आणि दीर्घ कालावधीनंतर सत्तेत आल्यावर देखील त्यांच्या व्यक्तिमत्वातील शालीनता टिकून राहिली.

साहित्य, संस्कृती, प्राचीन इतिहास अशा विविध विषयांच्या वाचनाने स्फुरलेली अटलजींची वाणी ही माझ्या पिढीने ऐकली, अनुभवली, त्यांचं सुसंस्कृत राजकरण हे जवळून बघता आलं ह्याचा मला खरंच आनंद आहे. भारतीय स्वातंत्र्य पंचाहत्तरीकडे वाटचाल करत असताना खऱ्या अर्थाने शेवटच्या देशव्यापी आणि देशभक्त नेतृत्वाची उणीव नक्कीच भासेल. अटलजींच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनम्र अभिवादन.

राज ठाकरे

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x