12 August 2020 7:59 PM
अँप डाउनलोड

केरळमध्ये अति पावसामुळे जनजीवन विस्कळीत, मृतांची संख्या वाढली

केरळ : केरळमध्ये काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले असून त्यात जवळपास ९७ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तुफान बरसणाऱ्या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. जोरदार बरसणाऱ्या पावसामुळे इडुक्की धरण पूर्ण भरले असून आता पाणी ओसंडून वाहू लागल्याने धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

केरळच्या इतिहासात पहिल्यांदाच पावसामुळे अशी परिस्थिती उद्भवली असल्याचं म्हटलं जात आहे. या अतिवृष्टीमुळे जवळपास ५४००० लोकं बेघर झाल्याचं केरळ सरकारने म्हटलं आहे. तुफान पावसाचा फटका जवळपास ६ जिल्ह्यांना बसल्याच वृत्त आहे. सरकाकडून सर्व मदत कार्य सुरु असून अनेक ठिकाणी पावसामुळे मदतकार्यात सुद्धा अडथळे येत आहेत. अनेक ठिकाणी सुरक्षेच्या करणामुळे शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्यात आली असून लोकांनी महत्वाच्या कामा शिवाय घराबाहेर पडू नये असं सरकाकडून कळविण्यात येत आहे. मदत कार्यात तब्बल १०,४०० लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

मुसळधार पावसामुळे पेरियार, इडुक्की आणि चेरूथोनी नदीवरच्या धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे कोची विमानतळ बंद करण्यात आले. १५ ऑगस्ट ते १८ ऑगस्टच्या दुपारी २ वाजेपर्यंत या विमानतळावरून कोणतेही विमान उड्डाण होणार नसल्याचे केरळ प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x