21 October 2019 4:26 PM
अँप डाउनलोड

न्यूयॉर्क टाइम्स'सह दोनशे पेक्षा अधिक वृत्तपत्रांची ट्रम्पविरोधीत संपादकीय

वॉशिंग्टन : मागील काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेतील वृत्तपत्रांमध्ये खटके उडू लागले आहेत. त्याचाच प्रत्यय म्हणजे काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील पत्रकारांवर विखारी टीका केली होती. दरम्यान, अमेरिकेतील पत्रकार हे देशद्रोही असून ते स्वतःचा आणि त्यांच्या वृत्तांकनामुळे अमेरिकेतील जनतेचा जीव धोक्यात घालत आहेत, असा थेट आरोप केला होता.

त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेतील तीनशेहून अधिक वृत्तपत्र एकत्र आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्रकारांवरील आरोपानंतर काल गुरुवारी अमेरिकेतील ‘बोस्टन ग्लोब’सह तब्बल २०० पेक्षा अधिक वृत्तपत्रांनी त्यांच्या विरोधात ‘संपादकीय’ लिहून ट्रम्प यांचा तीव्र निषेध नोंदविला आहे आणि त्यानंतर अमेरिकेतील संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.

ट्रम्प विरोधातील या अभियानात बोस्टन ग्लोब’ने अमेरिकेतील शेकडो वृत्तपत्रांमध्ये समन्वयकाचे काम केले. त्यामध्ये अमेरिकेतील २०० पेक्षा अधिक वृत्तपत्रांनी सहभाग घेतला, ज्यामध्ये बोस्टन ग्लोब’ आणि ‘न्यूयॉर्क टाइम्स’ सारख्या वृत्तपत्रांचा समावेश आहे. या सर्व वृत्तपत्रांनी ट्रम्प विरोधात संपादकीय लिहून तीव्र निषेध नोंदवला आणि थेट अभियान पुकारलं आहे.

हॅशटॅग्स

#Donald Trump(39)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या