16 April 2024 10:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Shares | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार, हे टॉप 3 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत पैसा वाढेल Suzlon Share Price | 1 वर्षात 416% परतावा देणारा शेअर तेजीत येणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Quant Mutual Fund | पगारदारांनो! महिना 1100 रुपयांची SIP बचत देईल 20 लाख रुपये, खास योजना सेव्ह करा Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना 5,000 रुपयांच्या मासिक गुंतवणुकीवर देईल रु. 3,56,829 देईल Numerology Horoscope | 16 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 16 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Man Infra Share Price | शेअर असावा तर असा! गुंतवणूकदारांना दिला 1900% परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
x

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भाजपसोबत युती नको, उद्धव ठाकरेंना भावना कळवल्या

मुंबई : केवळ आगामी लोकसभा निवडणुकीचा विचार न करता पक्षाचा दूरदृष्टीने विचार करून भारतीय जनता पक्षासोबतची युती तोडावी, अशा तीव्र भावना शिवसनेच्या प्रत्येक जिल्ह्यांतून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे कालच्या बैठकीत व्यक्त केल्या. परंतु, यावर पक्षप्रमुखांनी सध्या कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. दरम्यान, सर्वांशी पूर्ण चर्चा करूनच आपण अखेरचा निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितल्याची वृत्त आहे.

दिल्लीत सध्या संसदेचे अधिवेशन सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी, पक्षाच्या सर्व खासदारांची तातडीची बैठक मंगळवारी मातोश्रीवर आयोजित केली होती. तर राज्यातील शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक उद्या मातोश्रीवर आयोजित केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे युतीबाबतचा अंतिम निर्णय सुद्धा या बैठकांनंतर घेण्यात येईल, असे समजते.

विशेष म्हणजे ज्यांना आगामी लोकसभेची निवडणूक लढायची आहे, अशा जवळपास बहुतेक प्रतिनिधींनी भारतीय जनता पक्षासोबत युती करावी, अशी भूमिका मांडली आहे. तशी भावना त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कानावर स्पष्टपणे घातली आहे. तसेच शिवसेनेचे बहुतेक विद्यमान आमदार युतीसाठी अनुकूल असल्याचेही म्हटले जाते त्यामुळे अनेकवेळा स्वबळाची जाहीर घोषणा करणारे उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार ते पाहावं लागणार आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x