काश्मीरमध्ये CRPFच्या पथकावर दहशतवादी हल्ला, ३ जवान शहीद
काश्मीर, १८ एप्रिल : जम्मू-काश्मीरच्या सोपोर परिसरात शनिवारी दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या चौकीवर हल्ला चढवला. या हल्ल्यात CRPF चे दोन जवान शहीद झाले असून तीन जण जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, येथील नूरबाग परिसरात असणाऱ्या CRPF आणि स्थानिक पोलिसांच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. अचानकपणे गोळीबार सुरु झाल्याने दोन जवानांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर तिघे जखमी झाले. जखमींना उपचारासाठी एसडीएच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. सध्या या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी नूरबाग परिसरात शोध मोहीम राबवण्यात येत आहे.
#UPDATE Two jawans have lost their lives & another injured in a terrorist attack in Sopore, Baramulla in Jammu & Kashmir. https://t.co/u8vrWA6hm5
— ANI (@ANI) April 18, 2020
आठवड्याभरापूर्वी जम्मू काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात विशेष पोलिस अधिकाऱ्याची हत्या करुन त्यांच्या सहकाऱ्याला गंभीर जखमी करण्यात आले होता. या प्रकरणातील दोन दहशतवाद्यांचा शुक्रवारी खात्मा करण्यात आला होता. जम्मू पोलिस अधिकाऱ्यांनी या वृत्ताची पुष्टी देखील केली होती. सध्याच्या घडीला जगभरात कोरोना विषाणूचे संकट घोंगावत आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा घेत पाककडून काही दहशतवादी संघटना भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्नात असल्याची माहितीही भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिली होती.
पुलवामा जिल्ह्यातील नेवा भागातही शुक्रवारी सीआरपीएफ जवानांच्या एका तुकडीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात एका जवानाच्या पायला गोळी लागल्याने तो जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल केलं गेलं. तर ७ एप्रिलाल अनंतनाग जिल्ह्यात बिजबेहरा भागात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद झाला होता. तर एक जखमी झाला होता.
News English Summary: Terrorists attacked a central reserve police post on Saturday in Sopore area of Jammu and Kashmir. Two CRPF personnel were martyred and three were injured in the attack. According to preliminary information, a group of CRPF and local police were attacked by militants in the Noorbagh area here. Suddenly two gunmen died on the spot due to firing. The other three were injured. The injured have been taken to SDH Hospital for treatment. The terrorists fled the scene after the attack. A search operation is currently being conducted in Nurbagh area to track down the terrorists.
News English Title: Story terrorists attack a joint party of CRPF and police personnel in Sopore at Jammu kashmir News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News