VIDEO - कोरोना आपत्तीतील दोन टास्क पूर्ण; काय असू शकतो तिसरा टास्क?
मुंबई, ०९ एप्रिल: देशामध्ये कोरोना विषाणूचा विळखा वाढत चालला आहे. अशात ओडिशा सरकारने लॉकडाऊनचा अवधी वाढवला आहे. २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊन संपण्यापूर्वीच ओडिशा सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने लॉकडाऊनची मुदत वाढवण्याबाबत निर्णय घेण्यापूर्वीच ओडिशा सरकारने लॉकडाऊन वाढवला आहे. लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेणारे ओडिशा देशातील पहिले राज्य आहे.
दरम्यान, या आपत्तीत पंतप्रधान मूळ विषयांवर काम करण्यापेक्षा समाज माध्यमांवर नागरिकांना निरनिराळे टास्क देत आहेत. मात्र त्यामुळे राज्य सरकारच्या अडचणीत भर पडत असून, घरी शांत बसणाऱ्या लोकांची मानसिकता न ओळखता, ते समूहाने रस्त्यावर येतील असेच टास्क दिले जात आहेत. मुळात देशातील ६० टक्के लोकं झोपडपट्या आणि अत्यंत छोट्या घरांमध्ये राहतात. त्यांच्या घरांना कुठून आल्या गच्ची, बाल्कनी-गॅलरी वगरे आणि हेच पंतप्रधांनां ठाऊक नाही. दरम्यान, देशातील लोकांना याच आपत्तीत पहिला टास्क दिला तो घराच्या गच्ची, बाल्कनी किंवा खिडकीत उभं राहून थाळ्या आणि टाळ्या वाजवून अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांचे आभार मानावे असा. त्यानंतर नेमका काय धुमाकूळ घातला गेला अनेक राज्यांमध्ये ते सर्वश्रुत आहे.
पण खरं वास्तव माहीत आहे का? या सर्व कल्पना भाजपच्या IT सेलला इटलीतून मिळत आहेत. म्हणजे इटलीत १४ मार्च रोजी जे घडलं त्यातून मार्केटिंगची संधी उमगली. तुम्हीच पहा खालील १४ मार्चचा इटलीतील व्हिडिओ. हा व्हिडिओ ‘द टेलिग्राफ’चा असून १४ मार्च २०२० रोजी युट्यूब’वर अपलोड करण्यात आला होता.
त्यानंतर मोदींनी पुन्हा आठवडाभराने दुसरा टास्क भारतीयांना दिला आणि तो टास्क म्हणजे म्हणजे घरातील लाईट्स बंद करून गच्चीवर, गॅलरीत किंवा बाल्कनीत दिवे, मेणबत्या किंवा मोबाईलचा फ्लॅश करून अंधकारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी प्रार्थना करावी असा होता. त्यानंतर देखील देशभरात अनेक धक्कादायक घटना घडल्या ते देखील देशाने पाहिले आहे. अर्थात सदर टास्क देखील पंतप्रधानांनी स्पेनमध्ये पाहून भारतीयांकडून करून घेतला आणि स्वतःची मार्केटिंग करून घेतली. खरं नाही वाटत, तर पहा तो दुसऱ्या टास्कचा व्हिडिओ जो युट्यूब’वर यापूर्वीच म्हणजे २५ मार्च २०२० रोजी अपलोड करण्यात आला होता.
आता तुम्हाला वाटेल मोदींनी कुठे तिसरा टास्क दिला आहे. बरोबर नाहीच दिला, मात्र समाज माध्यमांवर फिरणाऱ्या खोट्या पोस्टवरून थेट देशाचे पंतप्रधान एकावर एक ट्विट करतात हेच मुळात अद्भुत आहे. पण इथेच त्या तिसऱ्या टास्कची बीज रोवून काही दिवसांनी परिस्थिती आटोक्यात येण्यास किंवा परिस्थिती जास्त चिघळेल तेव्हा तो तिसरा टास्क दिला जाण्याची दाट शक्यता अनेकांनी वर्तवली आहे. कारण तशीच तिसरी घटना इटलीत घडली आहे आणि ती म्हणजे तुमच्या घरातील गच्चीत, गॅलरीत किंवा बाल्कनीत उभं राहून राष्ट्रगीत गाऊन एकीचा संदेश द्या. अर्थात राष्ट्रगीत हा काही वादाचा विषय होऊ शकत नाही, मात्र इथे विरोधकांना कोंडीत पकडून स्वतःला जागतिक पातळीवरील हिरो असल्याचं सिद्ध करण्याची नामी संधी ते सोडतील अशी शक्यता नसल्याचं राजकीय तज्ज्ञांनी म्हटलं आहे. तुम्हीच पहा तो इटलीत घडलेल्या तिसऱ्या टास्कचा व्हिडीओ ज्याची शक्यता भारतात वर्तविण्यात आली आहे.
News English Summary: Meanwhile, in this disaster, the Prime Minister is giving various tasks to the citizens on social media rather than working on the core issues. However, it is adding to the problems of the state government, without knowing the mindset of the people who are quiet at home, they are being given the same task as a group. Basically 60 per cent of the people in the country live in slums and small houses. The mattresses, balcony-galleries, etc. where their houses come from and that is not what the Prime Minister knows. In the meantime, the first task that the people of the country had given in this disaster was to stand up in the mattress, balcony or window of the house and thank the attendants for the urgent service. But what happened if that is well known in many states.
News English Title: Story Corona Crisis PM Narendra Modi could give third task to the nation Covid19 News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा