आरेत बांधकाम केल्याशिवाय कांजूरमार्गला मेट्रो करताच येणार नाही - फडणवीस
मुंबई, २१ डिसेंबर: मागील काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्या वादात मेट्रो कारशेडचा प्रकल्प प्रलंबित आहे. या वादात केंद्राने देखील उडी घेत कांजूरमार्ग येथे होणाऱ्या प्रस्तावित मेट्रो कारशेडला विरोध करत कोर्टाचे दार ठोठावले आहे. त्यामुळे या प्रकरणाची गुंतागुंत अधिकच वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रावादी काँग्रेसचे सर्वेसेवा शरद पवार मध्यस्थी करणार असल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात या विषयावर सविस्तर चर्चा झाली आहे. शरद पवार म्हणाले याबद्दल कुठे तरी एकोपा निर्माण करायला पाहिजे. मुख्यमंत्री म्हणाले जर वाद सोडून यावर मार्ग निघाला तर बघायला हवा. याबाबत शरद पवार प्रयत्न करत आहेत. गरज पडली तर एकदोन दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी देखील ते चर्चा करतील. मुंबईच्या विकासात अडथळा नको यासाठी मुख्यमंत्री देखील प्रयत्न करत असून यात पवार मध्यस्थी करत असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. आधीपासून आमची भूमिका सामंजस्याची आहे. पण काही लोक यात राजकारण करत आहेत. म्हणून पवार साहेब यात मध्यस्थी करत असल्याचे ते म्हणाले होते.
पवारांच्या भूमिकेवर देवेंद्र फडणवीस यांनी देखील भूमिका स्पष्ट केली आहे. महाविकास आघाडी सरकारे उच्चाधिकार समिती स्थापन केलीय, त्या समितीच्या अहवालानुसार या मेट्रोचं 80 टक्के काम झालंय. आरे शेडमध्ये जे मेट्रो स्टेशन कारायचंय, त्याचही 100 कोटींपेक्षा जास्त काम झालंय. विशेष म्हणजे कांजूरमार्गच्या जागेचा उल्लेख करताना, आत्ता खर्चाचा बोजा पडेलच, शिवाय 2021 मध्ये होणारी मेट्रो 2024 सालापर्यंत मिळणार नाही, असे फडणवीस यांनी सांगितलं. तसेच, हा केवळ राज्य सरकारचा प्रकल्प नसून केंद्राचाही 50 टक्के हातभार या प्रकल्पासाठी आहे. त्यामुळे, हा विषय प्रतिष्ठेचा करण्यात काहीच अर्थ नाही. कारण, आरेत बांधकाम केल्याशिवाय कांजूरमार्गला मेट्रो करताच येणार नाही, हे सत्य आपण का लपवतो, असा सवालही फडणवीस यांनी विचारला आहे.
या मेट्रो प्रकल्पात आम्ही भावनिकदृष्ट्या जुडलेलो आहोत, मेट्रो होऊ नये असं कोणाचंच मत नाही. मी स्वत: मेहनत करुन 80 टक्के टनलिंगचं काम त्या काळात पूर्ण केलंय. त्यामुळेच पवारसाहेब जर मोदींशी बोलून यासंदर्भात चर्चा करणार असतील, तर त्यांचं स्वागतच आहे. उद्धव ठाकरेंनीही मोदींशी चर्चा करावी. हे पहा, शरद पवार आणि आमचे कितीही वैचारिक मतभेद असले तरी, पवारसाहेब जेव्हा तो अहवाल वाचतील, तेव्हा ते प्रॅक्टीकल निर्णय घेतील, पवारसाहेब कधीही चुकीचा निर्णय करणार नाहीत, असा आशावाद फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
News English Summary: Devendra Fadnavis has also clarified the role of Pawar. The Mahavikas Aghadi government has set up a high-powered committee. According to the report of that committee, 80 per cent work of this metro has been completed. More than Rs 100 crore has been spent on the metro station to be built in Aarey Shed. In particular, while referring to the Kanjur Marg site, Fadnavis said that the cost will be borne now and the Metro in 2021 will not be available till 2024. Also, this is not only a project of the state government but also a 50 per cent contribution of the Center for this project. Therefore, there is no point in making this subject prestige. Fadnavis has also asked why we are hiding the fact that Kanjurmarg cannot be metro built without construction in Aarey.
News English Title: Devendra Fadnavis clear his stand over Mumbai Metro Car Shed Kanjurmarg land news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News