8 May 2024 8:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

दोन वर्षात तीन पक्ष | बुडत्याला काठीचा आधार? | भाजपने तिकटी नाकारलेले सानप पुन्हा भाजपमध्ये

Former MLA Balasaheb Sanap, rejoined BJP Party

मुंबई, २१ डिसेंबर: नाशिकचे माजी आमदार बाळासाहेब सानप (Former Nashik MLA Balasaheb Sanap) यांनी शिवसेनेला धक्का देत पुन्हा भारतीय जनता पक्षाचा हात धरला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Opposition Leader Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत सानप यांनी मुंबईत भारतीय जनता पक्ष प्रवेश केला. “महाविकास आघाडीतील आमदारांमध्ये अस्वस्थता असल्यामुळे पक्षात बाहेरील नेत्यांचे आगमन होणार असल्यांच्या पुंग्या सोडल्या जात आहेत. मात्र वेगवेगळ्या पक्षातून आलेले राजकीय नेते प्रगल्भ आहेत” असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं.

“महाविकास आघाडातील तिन्ही पक्ष आगामी निवडणुका एकत्र लढवतील, असं सांगितलं जात आहे. मी म्हणेन त्यांनी नक्कीच एकत्र निवडणूक लढवली पाहिजे, माझी तर तशी इच्छाच आहे. असं वक्तव्य विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं.” तसेच, आगामी काळात भारतीय जनता पक्षात अनेकांचा प्रवेश होणार आहे, भारतीय जनता पक्ष सोडून कुणीही जाणार नाही. काहीजण उगाचच वावड्या उठवत असल्याचं म्हणत फडणवीस यांनी यावेळी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधल्याचेही दिसून आले.

२०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत शहराध्यक्ष म्हणून उमेदवारी वाटप पूर्णत: त्यांच्या हाती होते. त्यानंतर महापालिकाच पूर्णत: त्यांच्या अधिपत्याखाली होती. परंतु, अशी सर्व अनुकूल स्थिती असतानाही त्यांच्याविषयी पक्षात रोष वाढत गेला आणि त्यांनी नंतर तर थेट तत्कालीन पालकमंत्री आणि तत्कालीन भारतीय जनता पक्ष सरकारचे संकट मोचक गिरीश महाजन यांच्याशी वैमनस्य पत्करून संकट ओढवून घेतले. त्याची परिणीती त्यांची उमेदवारी कापण्यात झाली आणि त्यामुळेच बाळासाहेब सानप यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी करावी लागली. त्यातही अपयश आल्यानंतर त्यावेळी शिवसेनेने त्यांना चुचकारले आणि थेट शिवसेनेत ते दाखल झाले.

दरम्यान, नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सानप यांचा फायदा होऊ शकत असल्याने भारतीय जनता पक्षानेही सानप यांना पक्षात घेण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, दोन वर्षात तीन पक्ष बदलणाऱ्या नेत्याला पक्षात प्रवेश कशासाठी दिला जात आहे? असा सवाल भारतीय जनता पक्षाच्या एका गटातून उपस्थित होत आहे. सानप हे आज पक्षात येतील आणि महापालिका निवडणुकीनंतर पुन्हा त्यांनी पक्ष बदलला तर? असा सवालही भारतीय जनता पक्षामधील या गटाकडून विचारला जात आहे.

 

News English Summary: Former Nashik MLA Balasaheb Sanap pushed the Shiv Sena and again joined hands with the Bharatiya Janata Party. In the presence of Opposition Leader Devendra Fadnavis, Sanap joined the Bharatiya Janata Party in Mumbai. “As there is unrest among the MLAs in the Mahavikas Aghadi, there are rumors that leaders from outside the party will be coming. However, political leaders from different parties are strong, ”said Devendra Fadnavis.

News English Title: Former Nashik MLA Balasaheb Sanap rejoined BJP Party news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x