15 December 2024 11:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?

Waaree Renewables Share Price

Waaree Renewables Share Price | वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजी या सौरऊर्जा निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस नफा कमावून दिला आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटसह 2871.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजी कंपनी अंश )

आज हा स्टॉक विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. मागील 4 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 2 रुपयेवरून वाढून 2800 रुपये किमतीवर पोहचली आहे. आज मंगळवार दिनांक 7 मे 2024 रोजी वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजी स्टॉक 1.27 टक्के घसरणीसह 2,835 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 3037.75 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 157.02 रुपये होती. हा कंपनीच्या शेअर्सने मागील 4 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 137000 टक्के परतावा कमावून दिला आहे. 31 जुलै 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.08 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 6 मे 2024 रोजी वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजी स्टॉक 2871.40 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

मागील 4 वर्षांत वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 137948 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 2 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 4573 टक्के परतावा कमावून दिला आहे. 6 मे 2022 रोजी वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 61.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 2800 रुपयेच्या पार गेला आहे.

एका वर्षात वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1367 टक्के परतावा कमावून दिला आहे. 8 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 195.66 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2024 या वर्षात वारी रिन्युएबल कंपनीचे शेअर्स 554 टक्क्यांनी वाढले होते. 1 जानेवारी 2024 रोजी वारी रिन्युएबल कंपनीचे शेअर्स 438.83 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 6 महिन्यांत या सौरऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 951 टक्के परतावा कमावून दिला आहे.

7 नोव्हेंबर 2023 रोजी वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 273 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना मोठ्या प्रमाणात बोनस शेअर्स देखील वाटप केले आहेत. जुलै 2014 मध्ये कंपनीने आपल्या शेअरधारकांना 57:10 या प्रमाणात म्हणजेच प्रत्येक 10 शेअर्सवर 57 बोनस शेअर्स वाटप केले होते. मार्च 2024 मध्ये या कंपनीने आपले शेअर्स विभजित केले होते. कंपनीने आपले 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स 5 भागात विभाजित केले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Waaree Renewables Share Price NSE Live 07 May 2024.

हॅशटॅग्स

#Waaree Renewables Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x