15 June 2021 10:36 PM
अँप डाउनलोड

उलट भाजपमध्ये गेलेले आमदारच पुन्हा राष्ट्रवादीत येण्यासाठी आतूर - नवाब मलिक

BJP MLA, Joining NCP, Minister Nawab Malik, MahaVikas Aghadi

मुंबई, १० ऑगस्ट : राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी मोठा दावा केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, भाजपमध्ये गेलेले राष्ट्रवादीचे आमदार पुन्हा पक्षात येण्यासाठी आतूर आहेत. गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधाक दोन्ही एकमेकांचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा करत आलेले आहेत. त्यातच आता नवाब मलिक यांनी आणखी एक दावा केल्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा कोण कोणत्या पक्षात जाणार याची चर्चा सुरु झाली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

नवाब मलिक यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ‘काही लोकं राष्ट्रवादीचे १२ आमदार भाजपमध्ये जाणार असल्याची अफवा पसरवत आहेत. हे तथ्यहिन आणि चुकीची बातमी आहे. उलट भाजपमध्ये गेलेले आमदार पुन्हा राष्ट्रवादीत येण्यासाठी आतूर आहेत. पण याबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही. लवकरत निर्णय घेऊन माहिती सार्वजनिक केली जाईल.’

शरद पवार यांनी राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत ‘गेल्या घरी सुखी राहा’ असं सांगत दार बंद करून घेतले होते. पण, राज्यात आक्रमक झालेल्या भाजपला धडा शिकवण्यासाठी राष्ट्रवादीला ही संधी चालून आली आहे. त्यामुळे, ‘जे राष्ट्रवादीचे नेते भाजपमध्ये गेले आहे, त्यांना पक्षात प्रवेश द्यायचा की नाही, याचा निर्णय अद्याप घेतला नाही. लवकरच याबद्दल निर्णय घेतला जाईल आणि याची माहिती सार्वजनिक केली जाईल, असे स्पष्ट संकेत नवाब मलिक यांनी दिले आहे.

त्याचबरोबर, ‘गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे आमदार हे भाजपमध्ये प्रवेश करणार अश्या बातम्या पेरल्या गेल्या आहे. पण, ही निव्वळ अफवा आहे. राष्ट्रवादीचे कोणतेही आमदार भाजपच्या गळाला लागलेले नाही, अशी माहिती मलिक यांनी दिली.

 

News English Summary: NCP leader and minister Nawab Malik has made a big claim. He has said that NCP MLAs who joined BJP are eager to come back to the party. Over the last few days, both the ruling and opposition MLAs have been claiming to be in touch with each other.

News English Title: MLA who joined BJP is eager to return in NCP said Minister Nawab Malik News Latest Updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(625)#NCP(356)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x