23 September 2021 2:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

परमबीर सिंह राज्य सरकार पाडण्याच्या प्लानचा भाग होते? | वाझेही संपर्कात होता | धक्कादायक जबाब

Parambir Singh

मुंबई, २४ जुलै | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. गुरुवारी मुंबईत खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर शुक्रवारी ठाण्यातही त्यांच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. धमकवल्याच्या प्रकरणासह अनेक कलमांन्वये त्यांच्या विरोधात परमबीर आणि अन्य वरिष्ठ पोलिसांवर ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र परमबीर सिंग यांच्यामार्फत मार्च मध्ये म्हणजे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी योजना आखली गेली होती अशी माहिती एक जवाबाबत समोर आली आहे. त्याच अधिवेशनात १० मार्च २०२१ ला विरोधी पक्ष नेत्यांनी तशीच भूमिका घेत पावलं उचलली होती का अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. विशेष म्हणजे ज्याची माहिती राज्यातील आणि देशातील तपासयंत्रांना देखील नव्हती ती विरोधी पक्षनेत्याकडे कोणी पोहोचवली याची सूचक माहिती समोर आली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

परमबीर सिंह यांच्या निकटवर्तीयाकडून योजनेचा धक्कादायक खुलासा:
दोन दिवसांपूर्वी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या खंडणीच्या गुह्यांत परमबीर सिंह यांच्या निकटवर्तीय व्यावसायिक संजय पुनामिया याने मार्चमध्येच राज्यातील मंत्र्यांच्या विकेटचे भाकीत केल्याची धक्कादायक माहिती तक्रारदाराच्या जबाबातून समोर आली आहे, तसेच राज्यातील सरकार पडून परमबीर सिंह पुन्हा मुंबई पोलीस आयुक्त पदावर येणार असल्याचाही दावा करण्यात आला आहे.

मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात व्यावसायिक श्याम अग्रवाल यांच्या तक्रारीवरून परमबीर सिंह यांच्यासह पोलीस उपायुक्त अकबर पठाण आणि एकूण ८ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणात संजय पुनामिया आणि सुनील जैनला अटक करण्यात आली आहे.

जबाबात लेखाजोखा:
तक्रारदाराने दिलेल्या जबाबात, सिंह तसेच त्यांच्या सहकाऱ्याने मागितलेल्या खंडणीचा लेखाजोखा मांडला. दुसरीकडे, २३ मार्च ते ३० मार्च दरम्यान पुनामियासोबत झालेल्या बैठकांदरम्यान त्याच्या मोबाइलवर परमबीर सिंह आणि पोलीस उपायुक्त अकबर पठाण व इतर अधिकारी यांचे वेळोवेळी फोन येत होते. तेव्हा संजय पुनामियाने दावा केला होता की, परमबीर सिंह यांच्या १०० कोटी जमा करण्यासंबंधित पत्राबाबत सीबीआय, एनआयए चौकशी सुरू होणार, चार ते पाच मंत्र्यांची विकेट पडणार, सरकार अडचणीत येणार. तसेच वाझे संपर्कात असल्याचे सांगितले होते. पुनामियावर महाराष्ट्र सरकारमधील मोठ्या नेत्यांची विकेट घेण्याची जबाबदारी घेतल्याचेही नमूद केले. लवकरच महाराष्ट्र सरकार पडेल आणि सिंह पुन्हा आयुक्त पदावर येणार किंवा केंद्र सरकार सिंह यांना मोठे पद देणार असल्याचे भाकीत केले होते.’

संजय पुनामिया,सुनील जैन, मनोज घोटकर अशी अन्य आरोपींची नावे आहेत. शरद मुरलीधर अग्रवाल या बिल्डरने त्याच्याविरुद्ध कोपरी स्वतः कोपरी पोस्टे, गुन्हा क्रमांक – 176/2021 ठाणे शहर पोलीस आयुक्तालयमध्ये कोपरी पोलीस स्टेशन मध्ये. दिनां २३/०७/२०२१ रोजी रात्री फिर्यादी शरद अग्रवाल यांचेंकडुन २ कोटी रुपयांची खंडणी मागितली व जमिनी बळजबरीने नावावर करण्यात असल्याच्या आरोपावरुन गु. र. क्र. १७६/२०२१ भादंवि ३८४, ३८५,३८८,३८९,४२०,३६४ अ, ३४ १२० ब यांसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे.परमबीर सिंग यांचे सोबत संजय पुनमिया, सुनील जैन, मनोज घोटकर व मणेरे असे सह आरोपी आहेत व पुढील तपास पोलीस निरीक्षक फूलपगारे ( गुन्हे) करत आहेत.

फडणवीसांच्या काळापासूनच परमबीर सिंग यांचे खंडणी उकळविण्याचे प्रकार जोरात:
धक्कादायक म्हणजे देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना परमबीर सिंग यांची मार्च २०१५ मध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तपदी वर्णी लागली होती आणि तेव्हापासून ते स्वतःच्या बंगल्यावरच श्रीमंत गुन्हेगारांना खोट्या गुन्ह्यात अडकवून करोडोच्या खंडण्या आणि करोडोच्या जमिनी नावावर करून बळकवायचे असं वृत्त समोर आलं आहे. ठाण्याचे आयुक्त असताना खोट्या गुन्ह्यात अडकून एकाकडून ४.६८ कोटी रुपये उकळल्याप्रकरणी ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

विशेष म्हणजे निम्मी रक्कम ठाण्यातील त्याच्या तत्कालिन शासकीय बंगल्यात वसूल करून घेतली असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. तसेच फिर्यादीच्या आईच्या नावावर असलेल्या ८ कोटीचा भूखंड जबरदस्ततीने केवळएक कोटीला खरेदी खत बनवून घेतला आहे. या प्रकरणी परमबीर यांच्यासह तत्कालीन ठाणे गुन्हा अन्वेषण शाखेचे उपायुक्त व सध्या मुंबई आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेचे उपायुक्त पराग मणेरे यांच्यासह अन्य तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Resign was predicted in March month and Prambir Singh was part of plan news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(266)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x