16 December 2024 1:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

कर्जत तरुणावरील हल्ला प्रकरण | नितेश राणेंचा धामिर्क रंग देण्याचा कांगावा फसला, पीडित तरुण गुन्हेगारी पार्श्वभूमीचा

Karjat Attack

MLA Nitesh Rane | कर्जत तालुक्यातील तरुणावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. यानुसार, नुपूर शर्माच्या स्टेटसमुळे आणि हिंदुत्वाचा प्रचार केल्यामुळे हा हल्ला झाला, याबाबतचे कोणतेही पुरावे आतापर्यंतच्या तपासात समोर आलेले नाहीत. पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित प्रतीक पवार हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. प्रतिक पवार याच्यावर एकूण 3 गुन्हे दाखल आहेत. तो रागीट स्वभावाचा आहे, विनाकारण लोकांसोबत वाद करतो आणि त्याला डॉन व्हायचं आहे.

प्रतिक पवार याच वर्षी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत भगवा झेंडा घेऊन दाखल झाला होता आणि दलितांशी वाद केला होता. 3 जुलै 2022 रोजी प्रतिक पवार याने किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून जुनैद पठाण याच्या डोक्यात वार केला होता. या घटनेनंतर कर्जत पोलिसांनी प्रतीक पवार याला अटक केली होती. प्रतिक पवारवर झालेल्या हल्ल्यामध्ये अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींमध्ये जुनैदही आहे.

त्या रात्री नेमकं काय घडलं :
प्रतिक हा ४ ऑगस्ट रोजी कर्जतला परतला होता. कर्जतला परतताना प्रतिक थेट आरोपींच्या वस्तीत गेला आणि तिथे उभ्या असलेल्या मुस्लीम मुलांना चिथावणी देऊ लागला. तुला बघून घेईन, अशी धमकी दिली. मुस्लीम मुलांनी संतापून प्रतिकला काठीने मारहाण केली. आरोपींनी तलवार, कोयता, हॉकी स्टिक आणि दगड याने प्रतिकला मारहाण केल्याचं फिर्यादीने एफआयआरमध्ये लिहिलं आहे.

सीसीटीव्ही फुटेज हाती लागलं :
परंतु प्रतिकला कोणत्याही धारदार वस्तूने वार झालेला नाही असं मेडिकल रिपोर्टमध्ये समोर आल्याचं पोलिसांचं म्हटलं. जे सीसीटीव्ही फुटेज हाती लागलं आहे. त्यामध्येही आरोपींच्या हातात तलवार किंवा अन्य धारदार वस्तू कुठेही दिसत नाही. पोलिसांनी आरोपीचं सोशल मीडिया प्रोफाईल तपासलं मात्र कुठेही नुपूर शर्माच्या समर्थनात केलेली पोस्ट दिसली नाही. आरोपींना याबद्दल बोलताना सांगितलं की प्रतिक अनेकदा त्यांना धमकी देत असे त्यामुळे त्याला अद्दल घडवण्यासाठी हा हल्ला केला.

नितेश राणेंचा इशारा काय :
कर्जत येथील तरुणावर हल्ला झाल्यानंतर भाजप नेते नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, ‘ नुपूर शर्मांचं समर्थन केल्यामुळे पहिली घटना उदयपूरमध्ये घडली. नंतर अमरावतीत घडली. आज अमरावतीचा कोल्हे हत्याकांडाचा तपास एनआयए करत आहे. पहिल्या दिवसापासून भाजप आम्ही या कोणत्याही विषयाचं समर्थन नाही, हे स्पष्ट केलं. तो विषय बंद केला. पण त्यानंतर अमरावतीत कोल्हेंची हत्या करण्यात आली. 4 ऑगस्ट रोजी असाच प्रयत्न कर्जत-अहमदनगरमध्ये घडली. प्रतीक पवार नावाच्या एका युवकाला अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती कार्यक्रमाकडे जात असताना 10 ते 15 मुस्लिम युवकांनी थांबवलं. हल्ला करण्यासाठी आलेल्या तरुणांनी तू नुपूर शर्मांचं डीपी ठेवतोय, गावाच्या अन्य लोकांनाही ठेवायला सांगतोय.. हिंदू हिंदू म्हणून जास्त आवाज करतोयस… असं म्हणत त्याच्या हल्ला केला. त्यांच्या हतात धारदार हत्यार होते. त्याला खाली पाडलं. तो बेशुद्ध पडला. जमावाला तो मृत झाला, असं वाटलं. ते लोक तिथून निघून गेले. पण मित्र परिवार तेथे आला. लगेच त्याला अॅडमिट केलं. नंतर खासगी रुग्णालयात ठेवलंय. तो आज मृत्यूशी झुंज देतोय. त्याला 35 टाके पडलेत. बरगड्यांमध्ये वाईट मार लागलाय. अशा प्रकारे वारंवार हल्ले होत असतील. अमरावतीत हिंदुंना मारून टाकण्यापर्यंत मजल जात असेल तर आमचेही हात बांधेलेले नाहीत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Karjat Attack case MLA Nitesh Rane stand was totally political agenda after police investigation check details 07 August 2022.

हॅशटॅग्स

#Nitesh Rane(100)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x