15 December 2024 1:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

प्रसिद्ध लोककलावंत आणि ‘नवरी नटली’ फेम छगन चौगुले यांचं कोरोनामुळे निधन

Folk artist, Chhagan Chougule, covid 19, Passes away

मुंबई, २१ मे: प्रसिद्ध लोककलावंत आणि नवरी नटली फेम छगन चौगुले यांचं गुरुवारी निधन झालं. कोरोनाची लागण झाल्याने त्यांना मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. उपचार सुरू असतांनाच छगन चौगुले यांनी अखेरचा श्वास घेतला.

‘खंडेरायाच्या बानू लग्नाला नवरी नटली काल बाई सुपारी फुटली’ या गाण्याने छगन चौगुले यांना विशेष ओळख मिळवून दिली. याच बरोबर छगन चौगुले यांनी ‘कथा चांगुणाची’, ‘कथा श्रावण बाळाची’, ‘आईचे काळीज’, ‘अंबाबाई कथा : कथा तुळजापुरची भवानी’, ‘कथा देवतारी बाळूमामा’ यासारखे अनेक कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमाच्या सीडीज तर विशेष गाजल्या तर छगन चौगुले यांनी अनेकांच्या कुलदेवतांची गाणी आणि लोकगिते गायली आहेत.

सध्या महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. देशभरात राज्याचा कोरोनाच्या रुग्णसंख्येत पहिला क्रमांक आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राज्यापेक्षा महाराष्ट्रात तिप्पट रुग्ण आहेत. तरीही रुग्ण बरं होण्याचं प्रमाण वाढत आहे, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणता येईल. बुधवारी संध्याकाळी राज्याच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीत राज्यात दिवसभरात ६५ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. त्यातले ४१ मुंबईतले,नवी मुंबईतले ३, उल्हासनगर २, पुण्यातले १३, पिंपरी चिंचवड २,औरंगाबाद – २, सोलापूर – २ असे रुग्ण दगावले आहेत. आज राज्यात २२५० रुग्णांचं नव्याने निदान झालं.

 

News English Summary: Famous folk artist and Navri Natali fame Chhagan Chowgule passed away on Thursday. He was admitted to Seven Hills Hospital in Mumbai due to corona infection. Chhagan Chowgule breathed his last while undergoing treatment.

News English Title: Folk artist Chhagan Chougule died due to covid 19 infection in Mumbai News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x