Video Viral | तरुणांनो तुम्ही भाजीवाला, टॅक्सिवाला, रिक्षावाला ऐकलं असेल, पण ते 'वेदांतवाला' काय आहे भाऊ?, मग हा व्हायरल व्हिडिओ पहा

Video Viral | फॉक्सकॉन-वेदांता संयुक्त भागीदारीतून उभारण्यात येणारा सेमीकंडक्टर आणि फॅब डिस्ले निर्मिती प्रोजेक्ट गुजरातमध्ये होणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता. मात्र, गुजरातला गेल्यावरून आता केंद्रातील मोदी सरकारलाही लक्ष्य केलं जात आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही भाष्य केलंय.पत्रकार परिषदेत शरद पवारांनी फॉक्सकॉन वेदांता प्रोजेक्टबद्दल भाष्य केलं. तसेच केंद्रातील सरकारच्या भूमिकेबद्दलही मत मांडलं.
शरद पवार म्हणाले, ‘केंद्राची सत्ता हातात असल्याचे परिणाम काही राज्यांबाबत अनुकूल होत असतात. त्याच्यात गुजरातला लाभ मिळाला असेल, तर आपण तक्रार करण्याचं कारण नाही. मोदी तिथे आहेत. अमित शाह तिथे आहेत. हे मोठे लोक आहेत, ज्यांच्या हातात देशाची सुत्र आहेत. त्यांनी लक्ष गुजरातकडे दिलं तर आपण समजू शकतो’, असं शरद पवार म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार हे महाविकास आघाडीवर उलटे आरोप करत असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःच वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात येतं असल्याची माहिती विधानसभेत ऑन रेकॉर्ड दिली होती. तोच व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होतो आहे.
काय म्हणाले होते मुख्यमंत्री विधानसभेत :
मुख्यमंत्री विधानसभेत माहिती देताना म्हणाले होते, “अनेक उद्योगपती येत आहेत, ते वेदांतवाला आला होता, जवळपास ४ लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे करत आहेत. असे लोक येत आहेत आपल्याकडे..उद्योगासाठी आपल्याला… काय आहे शेवटी इथे त्यांना त्रास होता कामा नये, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऑन रेकॉर्ड विधानसभेच्या अधिवेशनात म्हणाले होते. त्यांनी ही माहिती थेट राज्याच्या सर्व प्रतिनिधींना आणि त्यांच्या मार्फत महाराष्ट्रातील जनतेला दिली होती.
विशेष म्हणजे त्यांनी हे जेव्हा जाहीरपणे अधिवेशनात सांगितलं की ते येत आहेत आणि जवळपास ४ लाख कोटीची गुंतवणूक करत आहेत असं ऑन रेकॉर्ड सांगितलं याचा अर्थ हा प्रकल्प महाराष्ट्रात होणार हे निश्चित झालं होतं. तसं नसतं तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशी माहिती थेट राज्याच्या विधानसभेत का दिली असतो हा मुख्य मुद्दा आहे. या मुद्द्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यापूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारवर करत असलेले आरोप हे पूर्णपणे खोटे असल्याचं सिद्ध होतंय. पण असं नेमकं काय घडलं नंतर याची चर्चा देशभर रंगली आहे. मात्र त्याच खरं कारण ठरलं आहे ते गुजरातमधील २-३ महिन्यावर आलेली विधानसभा निवडणूक आणि त्यामध्ये आम आदमी पक्षाने आणि काँग्रेसने बेरोजगारी आणि महागाई हे प्रमुख मुद्दे केल्याने गुजरामध्ये भाजप विरोधात रोष आहे. परिणामी, शिंदेंनी जाहीरपणे सांगताना म्हटले होते की आम्ही मोदींचे हस्तक आहोत. आता याच शिंदेंच्या वाक्याचा वापर देशपातळीवरील राजकीय विश्लेषक करत आहेत. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेतील ऑन रेकॉर्ड कबुलीने फसले आहेत हे नक्की आहे.
नेमका व्हिडिओ काय आहे ?
Video Viral | तरुणांनो तुम्ही भाजीवाला, टॅक्सिवाला, रिक्षावाला ऐकलं असेल, पण ते ‘वेदांतवाला’ काय आहे भाऊ?, मग हा व्हायरल व्हिडिओ पहा pic.twitter.com/PdZa8uHZIk
— महाराष्ट्रनामा (@MahaNewsConnect) September 15, 2022
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Viral Video of CM Eknath Shinde from state assembly house over statement regarding Vedanta Project check details 15 September 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर PSU आरव्हीएनएल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस फुल स्पीड पकडणार – Nifty 50
-
Mutual Fund SIP | महिन्याला करा केवळ 6000 रुपयांची गुंतवणूक, 1 कोटींच्या घरात परतावा कमवाल, संपूर्ण कॅल्क्युलेशन
-
IRB Infra Share Price | आयआरबी इंफ्रा शेअर वर्षभरात 23 टक्क्यांनी घसरला, पण HDFC सिक्युरिटीज ब्रोकरेज बुलिश – Nifty 50
-
IRFC Share Price | अर्थसंकल्पानंतर रेल्वे शेअर गुंतवणूकदारांची चिंता वाढली, स्टॉक BUY, SELL की Hold करावा – Nifty 50
-
IRFC Share Price | झपाट्याने वाढलेला रेल्वे शेअर आता सातत्याने घसरतोय, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IRFC
-
Income Tax on Salary | नवीन टॅक्स प्रणालीनुसार 1,275,000 रुपयांचे पॅकेज आणि अतिरिक्त इन्सेन्टिव्ह वर किती टॅक्स लागेल
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस शेअर्सवर फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले मोठे संकेत – NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | रेल्वे शेअर्स तेजीत, RVNL शेअर फोकसमध्ये आला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL
-
TATA Punch EV | धमाका ऑफर, 19,500 रुपयांच्या मासिक EMI वर घरी घेऊन या 'टाटा पंच EV, संधी सोडू नका
-
MTNL Share Price | सरकारी कंपनीचा स्वस्त शेअर तुफान तेजीत, आज 19 टक्क्यांचा अप्पर सर्किट, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: MTNL